Taapsee pannu shares heart touching video on migrants with series of pictures 
मनोरंजन

अभिनेत्री तापसीने कामगारांचा भावनिक व्हिडीओ केला शेअर, मात्र लोक करतायेत ट्रोल!

सकाळवृत्तसेवा

बॉलिवुड अभिनेत्री तापसी पन्नू तीचा दमदार अभिनय आणि सामजिक आशय असलेल्या चित्रपटांच्या निवडीसाठी ओळखली जाते. तापसी सोशल मिडीयावर सामाजिक मुद्द्यावर स्वतःची मते मोकळेपणाने व्यक्त करत असते. कोरोना व्हायरसमुळे प्रवासी कामगारांना सहन कराव्या लागलेल्या अडचणी दाखवणारा भावनिक व्हिडीओ तापसीने शेअर केला आहे.

तापसीने तीच्या ट्विटर अकांउटवरुन स्वतःच्या आवजात असलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये लॉकडाऊनच्या काळाता प्रवासी कामगारांनी ज्या अडचणींचा सामना करावा लागला त्या सर्व गोष्टींचा अनिमेशनच्या स्परुपात फोटो दाखवत आढावा घेण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये बातमीच्या स्वरुपात व्हायरल झालेले भावनिकफोटो या व्हिडीओत दाखवले आहेत. या फोटोंना पाहून लोंकाच्या डोळ्यात पाणी आले त्या सर्व फोटोंचा कलात्मक वापर या व्हिडीओत कोला आहे, या व्हिडीओला व्हायस ओव्हर खुद्द तापसीने दिला आहे. 

व्हिडीओ शेअर करत असताना तापसीने मार्मिक कॅपशन देखील दिले आहे, “ हे फोटो आपल्या डोक्यातून कधीच जाणार नाहीत, यांचे आवाज आपल्या डोक्यात परत-परत ऐकू येतील. भारतासाठी ही माहामारी फक्त व्हायरल इनफेक्शनपेक्षा खूप जास्त काही होतं. कदाचीत आपण सगळ्यांनी तोडलेल्या त्या हजारो ऱ्हदयांसाठी.”  या व्हिडीओत ओळीने फोटो दिसत राहातात आणि तापसीच्या आवाजात काही ओळी ऐकायला येतात. 

तापसी या 1 मिनीट आणि 42  सेकंदाच्या व्हिडीओमध्ये लोकांनी सहन कराव्या लागत असलेल्या अडचणी सांगताना ऐकू येते. लोक अन्न-पाण्याविना पायी, सायकलवर चालत घराकडे निघाले, पण त्यात कितीतरी जण उनाचा सामना करत तर काही भूकेने मरण पावले. आपल्या देशात प्रतिमांना महत्व आहे पण लोकांचा जीव स्वस्त झाला आहे. तापसी या व्हिडीओच्या माध्यमातून सांगत आहे.या व्हिडीओला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, सोबतच तुम्ही कामगारांसाठी काय मदत केली ते सांगा म्हणत नेटकरी तापसीला ट्रोल करत आहेत. तुम्ही झोपा काढा कामगारांसाठी सोनू सूद पुरेसा आहे. अशा शब्दात ट्रोलर्स कडून तापसीवर हल्ला चढवण्यात येत आहे. entertainment
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT