Taapsee Pannu: बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे ते तिच्या अभिनयाने नाही तर सततच्या वादामुळे. तापसी पन्नूची पापाराझींसोबत कोणती दुष्मनी आहे समजत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. आता तर तिला जया बच्चन यांची उपमा देऊन ट्रोल केले जात आहे.
('Aise mat karo', Taapsee Pannu tells paps not to click her. Netizens call her 'dusri Jaya Bachchan')
कलाकारांच्या दैनंदिन हालचाली टिपण्यासाठी पापाराझी जीवाचे रान करत असतात. पण त्यांचा त्रास होत असल्याचे तापसीने अनेकवेळा पापाराझींना सल्ले दिले आहेत. आता पुन्हा एकदा तापसी पन्नूने पापाराझींना त्यांच्या वर्तनवर प्रत्युत्तर दिले आहे. एका इंस्टाग्राम अकाउंटवर तापसी पन्नूचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे व्हिडिओमध्ये तापसी पापाराझींना तिच्या मागे येऊन फोटो न काढण्याचा सल्ला देताना दिसत आहे, यावेळी तापसी चांगलीच चिडलेली दिसली. ज्याची आता खूप चर्चा होत आहे.
झाले असे की, व्हिडिओमध्ये तापसी पन्नू ब्लॅक कलरच्या नेट टॉपमध्ये दिसत आहे. आणि ती कारमध्ये बसली आहे. पापाराझींनी तिला दरवाजा बंद करण्यापासून रोखले. यामुळे तापसी चिडली कारण ती त्याला वारंवार म्हणत होती, “ऐसे मत करो (असे करू नकोस) ऐसे मत करो ऐसे मत करो.' मात्र, ती कोणत्या कारणासाठी असे बोलत होती? व्हिडिओमध्ये हे स्पष्ट नाही. त्यानंतर पापाराझीने तिची माफी मागितली. तापसी पन्नूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि व्हायरल होताच ट्रोलिंगच्या जाळ्यात सापडली.
अनेक नेटकऱ्यांनी तापसीला ट्रोल केले आणि चक्क तिला पुढची जया बच्चन असे म्हटले आहे. कारण, जया बच्चनही पापाराझी दिसताच चुकीच्या पद्धतीने व्यक्त होतात. आता तापसीही तेच करत आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने ‘दुसरी जया बचन’ अशी कमेंट केली. तर दुसरा म्हणाला, “तापसी त्याच स्वभावाची आहे" तर काहींनी तिच्या समर्थनार्थही कमेंट केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.