dilip joshi, tarak mehta ka oolta chashma  SAKAL
मनोरंजन

ये पागल औरत.. जीवे मारण्याच्या चर्चांवर जेठालाल फेम Dilip Joshi कधी नको इतके भडकले

दिलीप जोशी यांनी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत अशा चर्चा सुरु आहेत

Devendra Jadhav

Dilip Joshi News: तारक मेहता का उलटा चष्मा (tarak mehta ka oolta chashma) मालिकेतून लोकप्रिय झालेले अभिनेते दिलीप जोशी यांनी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत अशा चर्चा सुरु आहेत.

नागपूर कंट्रोल रुममधून एका अज्ञातानं फोन केला होता. त्यानं सांगितलं होतं की, तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये दिलीप जोशी नावाचे कलाकार कुणी काम करतात त्यांच्याविषयी धक्कादायक बातमी आहे.

शिवाजी पार्कमध्ये त्यांचे जे घर आहे त्या घराबाहेर २५ लोग उभे आहेत. त्यांच्याकडे बंदुक आणि वेगवेगळी हत्यारं आहेत. असे त्या व्यक्तीनं सांगितले होते. पण आता या चर्चांवर दिलीप जोशी रागावले आहेत.

(taarak mehta ka ooltah chashmah dilip joshi dismisses fake news on life threat )

दिलीप जोशी म्हणाले.. "ज्याने ही चुकीची बातमी पसरवली त्याचे भले होवो. मला माझे हालहवाल विचारायला अनेक लोकांचे फोन आले. अनेक जुने मित्र आणि कुटुंबाचा त्यात सहभाग होता. लोक माझ्यावर इतके प्रेम करतात. अनेकांना माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी वाटली. हे सर्व पाहून मला खूप आनंद झाला."

दिलीप जोशी पुढे म्हणाले.. "“ही बातमी खोटी आहे. असं काहीही झालं नाही. याची सुरुवात कुठून आणि कशी झाली ते मला माहीत नाही. ही बातमी दोन दिवसांपासून चर्चेत आहे आणि हे ऐकून मी थक्क झालो. जर मी काही गैरकृत्य केलं नाही तर मला घाबरायची गरज काय. या बातमीत काही तथ्य नाही” अशा परखड तरीही गमतीशीर अंदाजात दिलीप जोशी यांनी प्रतिक्रिया दिली.

गेल्या अनेक वर्षांपासुन तारक मेहता का उलटा चष्मा हि मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या माध्यमातून जेठालालच्या भूमिकेत दिलीप जोशी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

मालिकेतल्या अनेक कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला असला तरीही जेठालालच्या भूमिकेत दिलीप जोशी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT