Dilip Joshi On Dayaben Esakal
मनोरंजन

Dilip Joshi On Dayaben: 'दया आय मिस यू', व्हॅलेंटाईन डे निमित्तानं जेठालालनं व्यक्त केली भावना..

'तारक मेहता का उल्टा चष्मा'ने १४ वर्षे पूर्ण केली आहेत. तो सतत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. बरेच लोक या शोमध्ये सामील झाले आणि बरेच लोक मधेच निघून गेले. पण काहींची उणीव आजही भासतेच, त्यात दयाबेनचं नावं येतं.

सकाळ डिजिटल टीम

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा कॉमेडी शो टिव्हिवरील सर्वात लोकप्रिय शा आहे. सर्व वयोगटात यां शोचे चाहते आहेत. घराघरात या शोची क्रेझ इतकी आहे की, त्यातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र आता हा शो पुर्वी सारखा राहिला नसल्याचंही चाहत्यांच म्हणणं आहे. याला कारण आहे म्हणजे या शोमधील लोकप्रिय कलाकारांनी हा शो सोडला.

बऱ्याच काळापासून या शोमधून स्टार कास्टच्या बाहेर पडल्यामुळे चर्चेत आहे. रोज कुठला ना कुठला जुना कलाकार शोमधून बाहेर पडतोय. कुणी नवा चेहरा शोमध्ये येत आहे. अशा परिस्थितीत, प्रेक्षकांना अनेकदा शोमधील जुन्या कलाकारांची आठवण होते. त्यापैकी, जर सर्वात जास्त चाहते कुणाला मिस करतात तर ती आहे दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी. तिला या शोचा प्रसिद्ध चेहरा मानला जायचा.


मात्र या शोचे चाहतेचं नाही तर जेठालालही त्याच्या बायकोला म्हणजेच दयाबेन या पात्राला मिस करत आहेत. याबद्दल खुद्द दिलीप जोशी यांनी सांगितलं आहे.

खरं तर, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये नव्या टप्पूच्या एन्ट्रीमुळे यावेळी संपूर्ण सेटवर आनंदाचं वातावरण आहे. अभिनेते नितीश भलुनी यांनी राज अनादुतची जागा घेतली आहे. अशा परिस्थितीत दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल यांनी आपला मुलगा टप्पू याला सगळ्यासमोर ओळख करुन देत आहेत. अलीकडेच कार्यक्रमात टप्पूच्या ग्रँड एन्ट्रीनंतर दिलीप जोशी यांनी नितीश भलुनी यांची मीडियाशी ओळख करून दिली. आलिकडेच टप्पूचं ग्रँड एन्ट्रीसाठी कार्यक्रम झाला.

दिलीप जोशी आणि नितीश यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात पत्रकारांनी दिलीप यांना दयाबेनबाबत प्रश्न केला. ती शोमध्ये परत कधी येणार असं विचारल्यावर त्यानं सांगितलं की, 'हे निर्मात्यांवर अवलंबून आहे. ते ठरवतील की त्यांना नवीन कोणाची जागा भरायची आहे की नाही.'

एक कलाकार म्हणून मला दया ही व्यक्तिरेखा आठवते. तुम्ही सर्वांनी खूप दिवसांपासून दया आणि जेठाच्या मजेदार सीन्सचा आनंद घेतला आहे. दिशा शो सोडून गेल्यापासून तो भाग, तो अ‍ॅगल , गमतीशीर भाग गायब झाला आहे. दया आणि जेठा यांच्यातील केमिस्ट्री गायब आहे. लोकही तेच म्हणत आहेत. पहा, मी नेहमीच सकारात्मक असतो. असित भाई नेहमी सकारात्मक असतात. त्यामुळे कधी काय होईल माहीत नाही. भविष्य कोणी पाहिलंय.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT