Tamil star Ajith's house wall demolished. Here's why SAKAL
मनोरंजन

Ajith House Demolished: सुपरस्टार अजितच्या घरावर पडला हातोडा, जाणुन घ्या कारण

अजित कुमारच्या घरावर पालिकेचा हातोडा पडलाय, कारण जाणून घ्या

Devendra Jadhav

Ajith House Demolished News: साऊथ सुपरस्टार अजित कुमारच्या घरावर हातोडा पडलाय. हो तुम्ही वाचताय ते खरं आहे. अजित कुमार काहीच दिवसांपुर्वी थिरुवनमियुरहून चेन्नईतील इंजामबक्कम येथील नवीन घरात शिफ्ट झाला.

पण त्यांना समस्येचा सामना करावा लागलाय. अजित कुमार यांच्या घरावर हातोडा पडलाय. काय आहे कारण जाणुन घ्या.

(Tamil star Ajith's house wall demolished. Here's why)

थिरुवनमियुरहून स्थलांतरित झाल्यानंतर सध्या चेन्नईच्या येथे राहणारा तामिळ अभिनेता अजितला त्याच्या घरावर हातोडा पडल्याने अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यांच्या घराबाहेर परिसरात रस्त्याचे विस्तारीकरण आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू असल्याने त्यांच्या घराची भिंत पाडण्यात आलीय.

फक्त अजित कुमारचं घर नव्हे, तर त्या भागातील अनेक रहिवाश्यांच्या घराच्या आजूबाजूच्या भिंती पाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे अजितच्या घरातील लोकांना घराबाहेर समुद्रकिनाऱ्यावर थेट जाता येत नाही.

अभिनेता अजितने 2017 साली त्याच्या राहत्या घरात काही आधुनिक बदल घडवून आणण्यासाठी त्याच्या घराचे नूतनीकरण केले होते. म्हणून, तो आपल्या कुटुंबासह एका वेगळ्या, भाड्याच्या घरात राहायला गेला.

अजितने घराला सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज केले आणि ते डिझाइन करण्यासाठी त्याने एका अनुभवी इंटिरियर डिझायनरची मदत घेतली होती. त्यांनी आपल्या मुलाला खेळण्यासाठी एक खास रुम आणि डान्स शिकण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन दिली.

कामाच्या आघाडीवर, अजितने वर्षाला फक्त एका चित्रपटात अभिनय करण्याचं जाहीर केलंय. आणि अलीकडेच, त्याने जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या थिनिवू चित्रपटात काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT