सध्या फक्त एकाच चित्रपटाची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर'. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतोय, याचीच वाट सगळे सिनेप्रेमी पाहात आहेत.
मराठ्यांच्या इतिहासातील अजरामर लढायांपैकी एक म्हणून कोंढाणा किल्ल्याची लढाई ओळखली जाते. स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या कैक मराठा सरदारांमध्ये अग्रस्थानी ज्यांचं नाव घेतलं जातं त्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर अभिनेता अजय देवगण आणि त्याची टीम तानाजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर गेल्या महिन्यात रिलिज करण्यात आल्यानंतर सोमवारी (ता.16) या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलिज करण्यात आला.
2 मिनीट 56 सेकंद कालावधीचा हा ट्रेलर अंगावर शहारे उभे राहतील, असाच आहे. मराठे आणि मोगल यांच्यामध्ये कोंढाणा किल्ल्यावर लढाई झाली होती. यावर लढाईवर आधारित हा चित्रपट आहे. पहिल्या ट्रेलरला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. त्यानंतर शंकरा आणि माय भवानी ही चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली. त्यानंतर आता चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलिज झाला असून काही तासांतच तो 16 लाखांपेक्षा अनेक नेटकऱ्यांनी पाहिला आहे.
व्हिज्युअल इफेक्ट आणि ग्रीपिंग स्टोरीलाईन असल्याने हा ट्रेलर पाहताच हॉलिवूडच्या '300' आणि अभिनेता प्रभासच्या 'बाहुबली' या चित्रपटांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कदाचित काकणभर सरस असाच हा चित्रपट असेल, हे या ट्रेलरने सिद्ध केले आहे.
या चित्रपटात अजय देवगणसोबत त्याची पत्नी अभिनेत्री काजोल, अभिनेता सैफ अली खान, मराठमोळा शरद केळकर, देवदत्त नागे, पंकज त्रिपाठी, जगपती बाबू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुढील वर्षी 10 जानेवारीला हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र, दुसऱ्या ट्रेलरने या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढविली आहे.
- #VijayDiwas हुतात्मा अरुण खेत्रपाल यांच्या शौर्यगाथेवर येतोय चित्रपट, 'हा' अभिनेता साकारणार भूमिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.