tejashri pradhan emotional post after audience give response of her premachi gosht serial SAKAL
मनोरंजन

Tejashri Pradhan: "इतकी वर्ष आधाराला फक्त काम", नव्या मालिकेला मिळणारा प्रतिसाद पाहून तेजश्रीची भावुक पोस्ट

अडीच वर्षानंतर मालिकेत कमबॅक करणाऱ्या तेजश्रीने सोशल मिडीयावर भावुक पोस्ट लिहीलीय

Devendra Jadhav

तेजश्री प्रधान ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. तेजश्रीने होणार सून मी या घरची, अग्गंबाई सासूबाई अशा मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

तब्बल अडीच वर्षानंतर तेजश्री प्रेमाची गोष्ट मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. या मालिकेला काहीच दिवसांमध्ये प्रेक्षकांचं प्रेम मिळालंय. त्यानिमित्ताने तेजश्रीने सोशल मिडीयावर भावुक पोस्ट शेअर केलीय.

तेजश्रीने आज थोडं व्यक्त व्हावंसं वाटलं अशी पोस्ट करत लिहीलं की, "कसे आणि कुठल्या शब्दात आभार मानू? तब्बल अडीच वर्षानंतर television वर पुन्हा परतले.. तुमच्यातलं कोणीतरी अचानक समोर येतं आणि पटकन म्हणतं “आम्हाला तू आमच्या घरातलीचं वाटतेस tv मध्ये पाहिल्यावर” … तेचं आपलं घरातलं माणूस अडीचं वर्षानंतर परत यावं , आपण त्याच्या गेल्या दिवसापासून परत येण्याच्या वाटेवर डोळे ठेवून रहावं, आणि घरी परतलेल्या “त्या” माणसाला तुमचे ते वाट पाहणारे डोळे पाहून भरूनचं यावं….तसचं काहीस माझ्या मनाचं झालयं, आज पहिल्या भागाला (episode ला) तुम्ही दिलेला प्रतिसाद कळल्यानंतर..

तेजश्री पुढे लिहीते, "इतकी वर्ष कामावर श्रद्धा ठेवून सातत्याने तुमच्या समोर येत राहीले..
पडले, धडपडले, पुन्हा उठले .. आधाराला फक्त काम होतं… शाश्वत फक्त काम होतं , इतकी वर्ष त्याच कामाने मला घट्ट धरून ठेवलं आणि त्या कामाला तुम्ही."

तेजश्री शेवटी लिहीते, "आज हे असं व्यक्त होण्याचा उद्देश इतकाचं… सांगावसं वाटलं ,
“मला जाणीव आहे तुमच्या आयुष्यातल्या ‘त्या’ अर्ध्या तासाची, जो तुम्ही माझ्या नावावर करता, जाणीव आहे त्या प्रेमाची, त्या आत्मियतेची आणि नकळत तुमच्या डोळ्यातून कधीतरी येणाऱ्या ‘त्या’ अश्रुच्या थेंबाची.. जो कधी लक्ष्मी सीठी, कधी जान्हवी साठी, कधी शुभ्रासाठी आणि आता मुक्ता साठी ढळतो.. “ आणि हिचं जाणीव सातत्याने पोटतिडकीने काम करण्याचं आणि त्या कामाशी एकनिष्ठ राहण्याचं बळ देत आली आहे , या पुढे ही देत राहील. पुन्हा एकदा … मनापासून आभार.. असेचं कायम माझ्या पाठीशी रहा. बाकी #Happy Life आहेचं."

तेजश्रीची प्रेमाची गोष्ट ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता स्टार प्रवाहवर बघता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आलिशान गाड्या, तब्बल २७१ कोटींची संपत्ती अन्...; महापालिका निवडणुकीत पुण्यातील 'या' आमदारांचे पुत्र सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले

Ruturaj Gaikwad: 'उठ, तयार हो आणि दाखवून दे...', आर अश्विनची भारतीय संघातून वगळलेल्या ऋतुराजसाठी खास पोस्ट

Accident News: मुरदोलीजवळ सीएनजी सिलिंडर भरलेला ट्रेलर उलटला; वाहतूक ठप्प, सिलेंडर लिक झाला अन् नेमकं काय घडलं!

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या प्रचाराचा वरळीतून शुभारंभ

Mokhada News: मोखाड्यात शिक्षण विभागाने घालून दिला माणुसकीचा आदर्श; अपघातग्रस्त विद्यार्थ्यांला दिला मदतीचा हात!

SCROLL FOR NEXT