TDM, TDM movie, TDM movie review, TDM showtimings, bhaurao karhade,
TDM, TDM movie, TDM movie review, TDM showtimings, bhaurao karhade,  SAKAL
मनोरंजन

TDM वर झालेला हा अन्याय चीड आणणारा.. प्रा. हरी नरके यांनी सर्वांना केलं 'हे' आवाहन

Devendra Jadhav

TDM News: सध्या महाराष्ट्रात एकच चर्चा आहे ती म्हणजे TDM सिनेमाची. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात TDM (टीडीएम) चित्रपटाची हवा असलेली पाहायला मिळतेय.

हा रोमँटिक चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट आणि या चित्रपटातील गाण्यांची क्रेझ प्रेक्षक वर्गामध्ये पाहायला मिळतेय.

'ख्वाडा', 'बबन' फेम भाऊराव कऱ्हाडेंच्या TDM या चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातलाय. कायमच अस्सल मातीतले हिरे वेचून त्यांना अभिनयाची संधी देणाऱ्या भाऊराव कऱ्हाडे यांच्या याही सिनेमाची चर्चा होती.

TDM सिनेमाला थिएटर मिळाले नाहीत त्यामुळे TDM चे दिग्दर्शक आणि कलाकार सर्व जण प्रेक्षकांसमोर हात जोडून ढसाढसा रडले.

(This injustice done to bhaurao karhade TDM is irritating.. Prof. Hari Narke expressed his anger)

या सर्व परिस्थितीवर प्राध्यापक आणि दिग्गज तत्ववेत्ते हरी नरके यांनी परखड मत व्यक्त केलंय. हरी नरके ट्विट करून लिहितात.. भाऊराव कऱ्हाडेंचा नवीन चित्रपट TDM प्रदर्शित झालाय. चित्रपट जिथं जिथं प्रदर्शित झालाय, तिथं तिथं चांगलं ओपनिंग आलंय.

पण बहुतांश ठिकाणाहून tdmचे शोज कॅन्सल करतायेत. किंवा प्राईमटाइम देत नाहीत. मराठी चित्रपटाबाबतचा हा अन्याय चीड आणणारा आहे. हा भेदभाव,पक्षपात मराठीत निषेधार्ह आहे.

हरी नरके पुढे मत मांडतात.. भाऊराव गुणी दिग्दर्शक आहेत.त्यांचे ख्वाडा आणि बबन हे चित्रपट चांगले चालले होते.तिसरा सिनेमा लागोपाठ त्यांना काढता आला.

त्यांच्या पहिल्या सिनेमानंतर त्यांना पुरस्कार देऊन आम्ही मित्रांनी गौरवले होते.त्यांच्याकडून खूप अपेक्षा असल्याचे व त्यांची एन्ट्री दमदार असल्याचे मी जाहीरपणे बोललो होतो.

हरी नरके शेवटी मत व्यक्त करताना लिहितात.. आता त्यांना थिएटर मिळत नाहीत तेव्हा कुठे आहेत मराठीवाले?असा एकाने प्रश्न केलाय. या लढाईत सर्वांनी उतरायला हवे.

पण एरवी हे मराठी रंगकर्मी,निर्माते, दिग्दर्शक,कलाकार (अपवाद वगळता) मराठीच्या व्यापक लढाईत कधीच फिरकत नाहीत. स्वतःवर अन्याय झाल्यावर मराठी आठवते.

मराठी भाषा, साहित्य, वाचन संस्कृती, शाळा, ग्रंथव्यवहार यात आपणही सहभाग दिला पाहिजे ही जाणीव यानिमित्ताने या मंडळींना होवो आणि मराठी चित्रपटांना मध्यवर्ती थिएटर्स मिळोत, प्राईम टाईम मिळो हीच सदिच्छा. आम्ही सोबत आहोत."

नुकतंच TDM चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि मुख्य कलाकार कालिंदी निस्तने आणि पृथ्वीराज यांनी प्रेक्षकांना हात जोडून ही दयनीय अवस्था सांगितली.

सिनेमा प्रेक्षकांना आवडतोय, परंतु शो नसल्याने प्रेक्षकांना माघारी जावं लागतंय. या अवस्थेमुळे सर्व टीमच्या डोळ्यात पाणी आलं. "आमच्यावर प्रेशर आहे", असं म्हणत थिएटर मालकांनी हात वर केलेत. आता थिएटर मालिकांवर नेमकं कसलं प्रेशर आहे, याचा खुलासा मात्र झाला नाहीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT