Akshaye Khanna Birthday, akshay khanna, akshay khanna affair, akshay khanna family SAKAL
मनोरंजन

Akshaye Khanna Birthday: लग्न करू नका सुखी राहा.. या एका कारणामुळे अक्षयने लग्न न करण्याचा निर्णय घेतला

अक्षय अलीकडेच अजय देवगण सोबत दृश्यम २ सिनेमात दिसला होता.

Devendra Jadhav

Akshaye Khanna Birthday: आज सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय खन्नाचा वाढदिवस. अक्षय खन्नाने बॉलिवूडमधला उत्कृष्ट कलाकार समजला जातो. अक्षय बॉलिवूडमध्ये फार निवडक सिनेमे करतोय.

पण ज्या सिनेमात अक्षय असेल त्या सिनेमातील अक्षयच्या अभिनयाचं कौतुक होतं.

आज अक्षयचा वाढदिवस. अक्षय आजवर कोणत्याही वादात अडकला नाही. ४८ वर्षांच्या अक्षय आजही अविवाहित आहे. काय आहे यामागचे कारण चला बघूया...

(this is the reason Akshaye Khanna not decided not getting married)

अक्षयने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने लग्न का केले नाही याविषयी खुलासा केलाय. अक्षय म्हणाला, मी रिलेशनशिपमध्ये नाही किंवा लग्न का केले नाही याचं कारण मला वाटतं कि मी मॅरेज मटेरियल नाही. मी लग्नाच्या आयुष्यासाठी आणि किंवा कोणाशी आजन्म बांधील राहू शकत नाही.

अक्षय पुढे म्हणाला.. लग्नामुळे सर्व काही बदलते आणि समोरील व्यक्ती तुमच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवायला लागते.

पुढे त्याने असे म्हटले आहे की लग्न करणे किंवा मुले होणे या गोष्टींचा एखाद्याच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो.

कारण इतर सर्व गोष्टी विसरता तुमचं आयुष्य फक्त मूल आणि लग्न याच गोष्टींच्या भोवती घुटमळते.

जेव्हा पिंकविलाने विचारले की वाढत्या वयानुसार अक्षयचं लग्नाबद्दल मत बदललं आहे का तेव्हा अक्षयने पटकन उत्तर दिले, "हे मत अजूनही आहे. आणि म्हणून मी कधीही लग्न करणार नाही.

मला माझे आयुष्य एकट्याने जगायचे आहे. मी काही काळ रिलेशनशिपमध्ये राहू शकतो पण मला माहित आहे की मी आयुष्यभर रिलेशनशिपमध्ये टिकणार नाही."

अक्षयने पुढे म्हणतो. "हे बघा मला इतके दिवस नातेसंबंधात राहणे खूप अनैसर्गिक वाटते. मला माहित आहे की बहुतेक जगाला ते अधिक नैसर्गिक वाटते परंतु मला नाही. मला वाटते की मला पाहिजे तेव्हा एका नात्यातून दुस-या नातेसंबंधात जाण्याची परवानगी दिली पाहिजे."

असं परखड मत अक्षयने व्यक्त केलंय. अक्षयची लग्नासंबंधी असलेली त्याची मतं थेट आणि मोकळी आहेत.

अक्षय हा दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा आहे. अक्षय अलीकडेच अजय देवगण सोबत दृश्यम २ सिनेमात दिसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold Wave : पुणे गारठले! पारा ९.४°C वर; तीन वर्षांतील विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद, पुणेकरांना हुडहुडी!

Latest Marathi Breaking News Live Update : इंदिरानगरमध्ये भोंदू बाबाचा घोटाळा उघड: महिलेला धमक्या देत ५० लाखांची फसवणूक

'या' प्रश्नाचं उत्तर देऊन सुष्मिता सेनने जिंकलेला मिस युनिव्हर्सचा ताज; काय होता तो प्रश्न? तुम्ही काय उत्तर दिलं असतं?

Pisces Love Horoscope 2026: 2026 मध्ये मीन राशीचं प्रेम कोणतं वळण घेणार? शनी सांगतो तुमचं वार्षिक राशीभविष्य

'उर्मिला कानेटकरचं जागी मला विचारण्यात आलं...' घासीराम कोतवाल या हिंदी नाटकात आशिष पाटीलची लावणी, साकारतोय 'गुलाबी' हे पात्र

SCROLL FOR NEXT