Tiger Claw Case Forest Department Celebrities esakal
मनोरंजन

Tiger Claw Case : वाघाच्या पंजाप्रकरणी 'बिग बॉस'च्या स्पर्धकाला अटक; अनेक सेलिब्रिटी अडचणीत, अभिनेत्यांच्या घरांची झडती

वाघाच्या पंजाप्रकरणी सेलिब्रिटींविरोधात (Celebrities) तक्रार दाखल केली होती.

सकाळ डिजिटल टीम

वनविभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांनी अनेक पथके तयार केली असून सेलिब्रिटींच्या घरांची झडती घेतली जात आहे.

बंगळूर : ‘बिग बॉस’चा स्पर्धक वर्थूर संतोषला वाघाच्या पंजा प्रकरणात (Tiger Claw Case) अटक करण्यात आल्याने अनेक सेलिब्रिटी अडचणीत सापडले आहेत. दर्शन, रॉकलाइन व्यंकटेश, जग्गेश आणि निखिल कुमारस्वामी यांनी याआधी वाघाची नखे घातलेले फोटो दिले आहेत.

वाघाच्या पंजाप्रकरणी सेलिब्रिटींविरोधात (Celebrities) तक्रार दाखल केली होती. या पार्श्‍वभूमीवर वनविभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांनी अनेक पथके तयार केली असून सेलिब्रिटींच्या घरांची झडती घेतली जात आहे. वन अधिकाऱ्यांनी अभिनेता दर्शनच्या आर.आर.नगर येथील घराची झडती घेतली.

मल्लेश्वरम्‌मधील अभिनेता जगेश आणि निर्माता रॉकलाइन व्यंकटेश यांच्या महालक्ष्मी लेआऊट येथील निवासस्थानावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून तपासणी केली. त्याचवेळी अधिकाऱ्यांनी तुमकूर जिल्ह्यातील कुनिगल तालुक्याच्या बिदनागेरे येथील शनैश्‍वर मंदिराचे धर्मदर्शी धनंजय गुरुजी यांच्या निवासस्थानावर छापा टाकला.

चिक्कमंगळूर जिल्ह्यातील कोप्पा येथील गौरीगड्डे आश्रमातील विनय गुरुजींचा वाघाच्या कातडीवर बसलेला फोटो व्हायरल झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आश्रमाला भेट देऊन अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT