Case booked against Tollywood actress Dimple Hayathi Esakal
मनोरंजन

Dimple Hayathi: IPS अधिकाऱ्याच्या कारला प्रसिद्ध अभिनेत्रीची धडक अन् गुन्हा दाखल होताच यू-टर्न

Vaishali Patil

Case booked against Tollywood actress Dimple Hayathi: दक्षिण भारतीय सौंदर्यवती डिंपल हयातीने अल्पावधीतच साउथ इंडस्ट्रीत मोठं नाव कमावले आहे. मात्र आता ती अडचणीत अडकली असल्याची माहिती समोर आली आहे.

जुबली हिल्स पोलिसांनी डिंपल आणि तिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या अपार्टमेंटमधील आयपीएस अधिकाऱ्याच्या कारचे नुकसान केल्याप्रकरणी तिच्या विरोधात ही कारवाई करण्यात येणार आहे.

ही घटना जरी जुनी असली तरी आता डिंपल अडचणीत आली आहे. डिंपल आणि तिच्या मैत्रिणीवर आरोप करणाऱ्या अधिकाऱ्याचा ड्रायव्हर कुमार यांच्याविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

डिंपल आणि पोलीस अधिकारी राहुल हेगडे दोघेही जुबली हिल्स अपार्टमेंट इमारतीत राहतात. डिंपल आणि तिचा प्रियकर लिव्ह-इन पार्टनर व्हिक्टर डेव्हिड याच्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 14 मे रोजी डिंपल आणि तिच्या मित्राने जाणूनबुजून अधिकाऱ्याच्या कारचं नुकसान केले होते. डिंपलने तिच्या गाडीने पोलिसांच्या गाडीला धडक दिली.

तक्रारीच्या आधारे जुबली हिल्स पोलिसांनी डिंपलविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि डेव्हिड दोघांनाही पोलिस ठाण्यात बोलावून 41A CrPC अंतर्गत नोटीस बजावली आहे.

मात्र डिंपलनेही याबाबत ट्विट पोस्ट शेअर करत तिची बाजू मांडली आहे. ट्विटमध्ये लिहिले की, Using power doesn’t stop any mistake शक्तीचा वापर करुन चूका टाळू शकत नाही. याशिवाय तिने एक हसणारा इमोजीही शेअर केला आहे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिलं की "सत्तेचा चुकीचा वापर केल्याने चूक लपत नाही", असं लिहित 'सत्यमेव जयते' या हॅशटॅगसह वापरला आहे. त्यामुळे तिच्या या ट्विटमधून ती काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Session: भास्कर जाधव आणि कल्याणशेट्टींमध्ये वाद, विधानसभेतच एकमेकांचा बाप काढला; धक्कादायक Video समोर

रामराव वडकुते कोण? राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा वितुष्ठता, राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने उद्धव ठाकरेंचा अबोला

'सावळ्याची जणू सावली' मध्ये होणार नव्या अभिनेत्रीची एंट्री; सावलीसमोर येणं आणखी एक संकट

Maharashtra Export: युद्धामुळे महाराष्ट्राला फटका! जेएनपीए बंदरात सुमारे 2 हजार कंटेनर अडकले, निर्यातीवर परिणाम

SCROLL FOR NEXT