Allu Arjun  
मनोरंजन

'पुष्पा'च्या ओटीटीवरील 'हिंदी' व्हर्जनची तारीख ठरली

टॉलीवूडच्या (Tollywood) पुष्पानं (Pushpa) गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ डिजिटल टीम

टॉलीवूडच्या (Tollywood) पुष्पानं (Pushpa) गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. बॉक्स ऑफिसवर (box Office) देखील या चित्रपटानं मोठी कमाई केली आहे. तीनशे कोटींपर्यत पुष्पाची बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. अजुनही हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये गर्दी करत आहे. ओमीक्रॉनमुळे (Omicron Varient) सध्या वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध सरकारनं जाहिर केल्यानं मनोरंजन (entertainment) क्षेत्रावर संकट आहे. त्याचा परिणाम नव्यानं प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना बसला आहे. पुष्पालाही थोड्याफार प्रमाणात त्याचा फटका बसला आहे. अन्यथा अजूनही थिटएरमध्ये प्रेक्षकांनी मोठी झुंबड पाहायला मिळाले असती.

निर्मात्यांनी ओमीक्रॉनचा वाढणारा धोका लक्षात घेऊन पुष्पा हा ओटीटीवर (Pushpa On Ott) प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. थिएटरमध्ये पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणले. त्यामध्ये अल्लु अर्जुन (Allu Arjun) , समंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांच्या भूमिका आहेत. अॅमेझॉन प्राईमवर यापूर्वी तमिळ, तेलुगू मध्ये प्रदर्शित झालेला पुष्पा हिंदीमध्ये कधी प्रदर्शित होणार याविषयी प्रश्न विचारला जात होता. त्यावर अखेर अॅमेझॉननं येत्या 14 जानेवारीला हिंदीत पुष्पा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये पुष्पानं मोठ्या प्रमाणात कमाई केल्याचे दिसून आले आहे. सध्याच्या घडीला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून पुष्पाचे नाव घ्यावे लागेल.

ओमीक्रॉनचा फटका टॉलीवूडच्या एका बिग बजेट चित्रपटाला बसला आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षक आरआरआर चित्रपटाची वाट पाहत होते. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरला कोट्यवधी व्ह्युज मिळाले होते. त्यानंतर चाहत्यांना चित्रपटाचे वेध लागले होते. 7 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र ओमीक्रॉनच्या नव्या निर्बंधामुळे आरआरआरचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT