Pushpa Movie Box Office
Pushpa Movie Box Office 
मनोरंजन

'पुष्पा' नावाप्रमाणेच 'फायर', 45 दिवसांत 100 कोटींची कमाई!

सकाळ डिजिटल टीम

Pushpa The Rise Movie: टॉलीवूडच्या (Tollywood) पुष्पा द राईज या चित्रपटानं (Pushpa Allu Arjun) गेल्या काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. साधारण दीड महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पुष्पानं आता शंभर कोटींचा टप्पा पार केला आहे. अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना (rashmika mandana) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box office प्रचंड कमाई केली आहे. आता तर हा चित्रपट ओटीटीवर देखील प्रदर्शित झाला आहे. पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या पुष्पाचा फिव्हर अद्यापही सोशल मीडीयावर आहे. त्याच्या गाण्यांचे रील्स, मीम्स तुफान व्हायरल झाले आहे. श्रीवल्ली आणि सामी गाण्यानं लहानांपासून आबालवृद्धांना वेड लावलं आहे. अल्लु अर्जुनला आता बॉलीवूडमध्ये पसंत केलं जाऊ लागले आहे.

पुष्पाच्या (pushpa OTT) हिंदी व्हर्जननं साऱ्या देशभर कमाल केली होती. त्याचा प्रभाव अजुनही प्रेक्षकांच्या मनावर आहे. अल्लु अर्जुनचा डान्स, त्याची भूमिका, त्याचे संवाद आणि हटके स्टाईल यानं चाहत्यांना घायाळ केलं आहे. पुष्पा मध्ये अल्लु अर्जुनच्या तोंडी एक संवाद आहे. त्यामध्ये तो म्हणतो माझं नाव पुष्पा आहे. मी काही एखादं फूल नाही. आग आहे. या संवादानं बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. चित्रपटातील तो संवाद बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या दृष्टीनं प्रत्यक्षात आल्याचे दिसुन आले आहे. सुरुवातीला या चित्रपटातील उ अंटावा गाण्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसुन आले होते. प्रसिद्ध अभिनेत्री समंथानं त्या गाण्यामध्ये स्पेशल परफॉर्मन्स दिला आहे. मात्र तिच्यावरही नेटकऱ्यांनी टीका केली होती. त्या गाण्याचा वाद हा कोर्टापर्यत गेला होता. मात्र पुष्पाच्या यशानं तो वाद आता प्रेक्षक विसरले आहेत.

पुष्पाच्या वेळेस बॉलीवूडमधूनही काही मोठ्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यामध्ये रणवीर सिंगचा बहुचर्चित असा 83 हा चित्रपट होता. मात्र त्याला अपेक्षेनुसार काही यश आले नाही. गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत होते. मात्र दोन आठवड्यांपेक्षा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तग धरू शकला नाही. पुष्पाच्या फायरनं सगळ्या चित्रपटांना झटका बसल्याचे दिसून आले आहे. येत्या काळात टॉलीवूडचे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये एस एस राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपटही आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT