Hansika Motwani esakal
मनोरंजन

Hansika Motwani: हंसिका मोटवानी लवकरच अडकणार विवाहबधंनात

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी नंतर लग्नाचा सीजन सुरु होतो. सर्वत्र लग्नाची धामधुम पहायला मिळते. बॉलिवूडमध्येही लग्नाची धामधुम पहायला मिळणार आहे. सिंगर पलक मुच्छालही लवकरच प्रियकर मिथूनसोबत लग्न बंधनात अडकणार आहे त्याच्या पाठोपाठ सिद्धार्थ आणि कियारा, आथिया के.एल.राहुल  यांच्यासुद्धा लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

त्यातच आता चित्रपटसृष्टीतील अजून एक अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. ती माहिती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या लग्नाची आहे.

बॉलिवुड अभिनेत्री हंसिका मोटवानी एका महिन्याच्या कालावधीच्या आतच विवाहबंधनात अडकणार आहे. हंसिका ४ डिसेंबरला लग्न करणार आहे. लग्नविधी 2 डिसेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान आयोजित केला जाणार आहे. हंसिकाचं लग्न  डेस्टिनेशन वेडिंग असणार आहे. या विवाहसोहळ्यात  फक्त त्यांचे कुटुंब आणि जवळचे मित्रचं सहभागी होणार आहेत. हा लग्न समारंभ जयपूरला पार पडेल.

समोर आलेल्या माहितीनुसार 2 ते 4 डिसेंबर मध्ये  मेहेंदी, संगीत आणि हळद समारंभ होणार आहे. प्रत्येक दिवसाचा ड्रेस कोड आणि थीम असणार आहे. हा विवाह जयपूरमधील मुंडोटा किल्ला आणि राजवाड्यावर आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगितल आहे.

तिच्या जवळच्या मित्राच्या माहितीनुसार प्रेम विवाह आहे हंसिका तिच्या प्रियकराशी लग्न करत आहे,ज्याला ती आता काही वर्षांपासून ओळखते.नवऱ्या मुलाचं नाव आणि ओळख दोन्ही अजून उघड झालेलं नाही याबाबत हंसिकाने मीडियाला काहीच स्टेटमेंट दिलेलं नाही. तर लवकरच याची अधिकृत  घोषणा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तो दुसरा कोणीनसून तिचा मित्र आणि बिझनेस पार्टनर सोहेल कथुरियासोबत असल्याचं बोललं जात आहे.

हंसिका आणि सोहेल हे 2020 मध्ये स्थापन झालेल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार असल्याचे सांगितले जाते. याआधी हंसिका तीन चित्रपटांमध्ये तिचा सहकलाकार सिम्बू याला डेट करत होती. 2013 मध्ये या जोडप्याने त्यांचे नाते उघड केले होते मात्र  2014 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT