Tollywood: Why Rishabh Shetty does not want to work with Rashmika? Google
मनोरंजन

Kantara: रश्मिकासोबत काम करण्यास 'कांतारा'च्या ऋषभ शेट्टीचा नकार?;व्हायरल व्हिडीओत स्पष्टच बोलताना दिसला

ऋषभ शेट्टीचा एक जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे,ज्यात कोणत्या अभिनेत्री सोबत काम करायला आवडेल हा प्रश्न त्याला विचारला होता.

प्रणाली मोरे

Kantara: सध्याचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'कांतारा' अजूनही सिनेमागृहात धुमाकूळ घालताना दिसत आहे. सिनेमाचा अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी बॉक्सऑफिसवर आपल्या अभिनयाच्या जादूमुळे चर्चेत असलेला पहायला मिळत आहे. पण सध्या तो आपल्या सिनेमासाठी नाही तर आपल्या एका जुन्या मुलाखतीत रश्मिका मंदाना विषयी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. या व्हिडीओला पाहिल्यानंतर आपण समजून जाल की अखेर ऋषभला रश्मिकासोबत काम का नाही करायचे? .(Tollywood: Why Rishabh Shetty does not want to work with Rashmika?)

सध्या ऋषभ शेट्टीची एक जुनी मुलाखत जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. त्याला त्या मुलाखतीत विचारलं गेलं होतं की,'समंथा रुथ प्रभू,रश्मिका मंदाना,किर्ती सुरेश की साई पल्लवी यांच्यापैकी कोणासोबत तुला काम करायला आवडेल?', तेव्हा ऋषभ शेट्टी या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना म्हणाला होता,''मी माझी कथा लिहिल्यावर त्यात कोण अभिनय करेल यावर निर्णय घेत असतो. मला नवीन लोकांसोबत काम करायला आवडते कारण त्यांची पाटी कोरी असते. त्यांचे खूप नखरे नसतात. पण तुम्ही जी नावं घेतलीत त्या अभिनेत्री मला फारशा आवडत नाहीत. पण साई पल्लवी आणि समंथासोबत काम करायला मला आवडेल''.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

त्या मुलाखतीत ऋषभ शेट्टीनं समंथा आणि साई पल्लवीची प्रशंसा केली आणि त्यांना खऱ्या कलाकार म्हणून संबोधलं. त्यानं रश्मिका मंदानाचं नाव न घेता संमथा आणि साई पल्ल्वीला सध्याच्या चांगल्या अभिनेत्री असं देखील म्हटलं.

यानंतर आणखी एक क्लीप व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये रश्मिका म्हणताना दिसतेय की तिला कधीच अभिनेत्री बनायचं नव्हतं. एका मुलाखतीत ती म्हणाली होती एक अभिनेत्री बनण्याचं तिचं ध्येय कधीच नव्हतं. तिचा इंडस्ट्रीतला प्रवेश खूप अचानक घडून आला. ती म्हणाली, तिला एका प्रॉडक्शन हाऊसमधनं फोन आला होता,तेव्हा वाटलं की प्रॅंक कॉल असेल. पण तिनं त्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव घेतलं नाही. पण यानंतर मात्र तिला ट्रोल केलं जाऊ लागलं. आणि जेव्हा तिला कामच करायचं नव्हतं सिनेमात तेव्हा तिला संधी देणाऱ्याला पण लोक कोसू लागले.

रश्मिकानं ज्या प्रॉडक्शन हाऊसचा विषय काढला त्याचं नाव आहे परमाह स्टुडिओ,जो तिचा पूर्वाश्रमीचा बॉयफ्रेंड रक्षित शेट्टीचा आहे. रक्षित शेट्टी हा ऋषभ शेट्टीचा खास मित्र आहे. ऋषभ शेट्टीने देखील याच प्रॉडक्शन हाऊससोबत आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT