Tunisha Sharma death, Police find out sheezan Khan secret girlfriend Google
मनोरंजन

Tunisha Sharma Death: तुनिषाला फसवत होता शीझान..पोलिसांच्या समोर आली सीक्रेट गर्लफ्रेंड

शीझान खानमुळेच आपल्या मुलीनं आत्महत्या केली,तो तिला धोका देत होता असे आरोप तुनिषा शर्माच्या आईनं केले होते.

प्रणाली मोरे

Tunisha Sharma Death: तुनिषा शर्मानं वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी आपलं आयुष्य संपवत या जगाचा निरोप घेतला. तुनिषानं २४ डिसेंबर रोजी आपल्या मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषावर अंत्यसंस्कार झाले असून तिला शेवटचा निरोप देताना तिच्या आईसोबत मित्रपरिवारालाही शोक अनावर झाला होता.

तुनिषानं जगाचा निरोप घेतला असला तरी तिच्या मागे अनेक प्रश्न ती सोडून गेली आहे. तिच्या मत्युचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. तिचा बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शीझान खानला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. त्याला कोर्टातही सादर केलं गेलंय. चौकशी दरम्यान काही नवीन गोष्टी पोलिसांना आता कळाल्या आहेत.(Tunisha Sharma death, Police find out sheezan Khan secret girlfriend)

तुनिषा शर्मानं आत्महत्या केली त्यासाठी शीझान खानला जबाबदार ठरवलं जात आहे. तुनिषाच्या आईनं शीझान खानवर गंभीर आरोप केलेयत. तुनिषाच्या आईचं म्हणणं आहे की शीझाननं त्यांच्या मुलीचा विश्वासघात केला होता. शीझानचे अनेक मुलींसोबत संबंध होतं. शीझाननं त्या कारणानं तुनिषाला सोडलं होतं. आणि यामुळेच तुनिषानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

तुनिषाच्या आईनं आरोप केल्यानंतर पोलिस आता या प्रकरणात अधिक खोलवर तपास करत आहेत. आणि पोलिसांनी शीझानच्या सी्क्रेंट गर्लफ्रेंडचा छडा लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वालीव पोलिसांना त्या मुलीची ओळख पटलेली आहे.पण अद्याप त्यांनी तिची साक्ष नोंदवलेली नाही. तसंच शीझानने त्या सीक्रेट गर्लफ्रेंडसोबतचे डीलीट केलेले मेसेज रिट्रिव्ह करण्याचं कामही बाकी आहे.

पोलिसांनी सेटवरील शूटचं DVR आपल्या ताब्यात घेतलं आहे. शूटच्या दरम्यान त्या दोघांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून त्यांच्यात काही वेगळं घडलं होतं का याचा तपास पोलिस यामाध्यमातून करणार आहेत.

पोलिसांनी रॉ फूटेज त्यासाठी ताब्यात घेतलंय. पोलिसांच्या चौकशी दरम्यान शीझानच्या सीक्रेट गर्लफ्रेंडचा छडा लागल्यानं आता केसला वळण मिळालं आहे,त्यामुळे शीझानच्या अडचणी वाढणार आहेत. शीझानच्या सीक्रेट गर्लफ्रेंडचे नाव आणि इतर तपशील पोलिसांनी समोर आणलेला नाही,कारण पोलिसंचे म्हणणे आहे की अद्याप त्या मुलीची चौकशी होणं बाकी आहे.

शीझानची साक्ष पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर शूट केली आहे. शीजानच्या सर्व व्हॉट्स अॅप चॅट आणि रेकॉर्डिंगला पोलिसांनी रिट्रीव्ह केलं आहे. पोलिसांना त्याच्या फोनमधून तुनिषा सोबतच्या चॅट संदर्भात काही आक्षेप घेण्यासारखं सापडलेलं नाही. पण अद्याप तुनिषाच्या फोनला पोलिस अनलॉक करू शकलेले नाहीत.

दरम्यान शीझाननं तुनिषासोबतच्या ब्रेकअपचं वेगळंच कारण आता सांगितलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला आपल्या करिअरवर फोकस करायचं होतं म्हणून त्यानं ब्रेकअप केलं होतं.

शीझान आता पोलिसांच्या ताब्यात आहे. अशात पोलिस पहिल्यांदा शीझानची कसून चौकशी करण्याच्या मागे लागलेयत. आता यामधनं त्याच्या सीक्रेट गर्लफ्रेंडची कोणती नवी माहिती समोर येते,आणि केसचा गुंता सोडवायला ती कशी कामी येतेय याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

SCROLL FOR NEXT