भाभीजी घर पर है फेन अभिनेता दीपेश भानच्या अचानक जाण्यानं त्याच्या बायकोवर वाईट वेळ येऊन ठेपली आहे. क्रिकेट खेळणं या अभिनेत्याला महागात पडलं. खेळताना हा अभिनेता पडला होता. रूग्णालयात पोहोचेपर्यंत या अभिनेत्याचा मृत्यू झाला. या अभिनेत्याचं गेल्या दोन वर्षाआधीच लग्न झालं होतं. त्याच्या मागे पत्नी आणि १८ महिन्यांचं चिमुकलं बाळ आहे. दीपेशची पत्नी ही गृहिणी आहे. अशावेळी घराचे हप्ते आणि चिमुकल्या बाळाच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्या एकटीवर येऊन ठेपलीय. (Bhabhi ji ghar par hai fem deepesh death made his wife helpless)
प्रेक्षकांना सतत हसवणाऱ्या दीपेशच्या अचानक जाण्यानं टीव्ही इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जातेय. तसेच त्याच्या जाण्याने त्याच्या कुटुंबियांची स्थितीही वाईट आहे. दीपेशचं सोशल मीडिया अकाऊंट बघता दीपेश जीवनात कायम आनंदी आणि दुसऱ्यांना हसवणारा माणूस होता हे कळून येतं.अनेक कलाकारांकडून त्याच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं जातंय.
दीपेशने होमलोन घेतले असल्यामुळे त्याचे मासिक हप्ते आहेत. दीपेशच्या पत्नीला नोकरी नसल्याने आता तिच्यावर घराचे हप्ते भरण्याबरोबरच तिच्या १८ महिन्याच्या लहान बाळाची जबाबदारी येऊन ठेपलीय. दीपेशच्या निधनानंतर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसेने देखील दीपेशच्या पत्नी आणि बाळाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.