TV Actress has accused her former co actor of rape Esakal
मनोरंजन

Tv Actress चा सह-अभिनेत्यावर बलात्काराचा गंभीर आरोप.. म्हणाली,'त्याच्या घरी पार्टीला गेले होते तेव्हा..'

हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीनं आपल्याच मालिकेतील अभिनेत्यावर बलात्काराची केस दाखल केली आहे.

प्रणाली मोरे

Tv Actress Rape Case: एका टी.व्ही अभिनेत्रीनं आपल्याच मालिकेतील सहकलाकारावर बलात्काराचा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. १३ मार्चला अभिनेत्रीनं अभिनेत्याच्या विरोधात बांगर नगर,लिंक रोड पोलिस स्टेशन, मुंबई इथं तक्रार नोंदवली होती. अभिनेत्रीनं ४ लाखाची फसवणूक,पैशासाठी तिचा गैरवापर करणं,धमकी देणं अशा तक्रारी केल्या होत्या.

यानंतर अभिनेत्रीनं ५ एप्रिलला गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये अभिनेत्याच्या विरोधात थेट बलात्काराचा आरोप केला. अभिनेत्याच्या विरोधात आयपीसी सेक्शन ३७६(२)(एन),३७७,५०९ आणि ५०६ अंतर्गत प्राथमिक तक्रार नोंदवण्यात आली आहे. दिंडोशी सत्र न्यायालयानं २६ एप्रिल रोजी अभिनेत्याचा जामिन अर्ज देखील रद्द केला होता.

ईटाईम्सच्या रिपोर्टनुसार अभिनेत्रीनं म्हटलं आहे,''आम्ही पहिल्यांदा डिसेंबर २०२१ मध्ये एका मालिकेच्या शूटनिमित्तानं भेटलो होतो आणि जानेवारी २०२२ मध्ये आम्ही डेटिंग सुरू केलं होतं. ९ जानेवारी २०२२ ला पहिल्यांदा आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो,जेव्हा त्याच्या घरात पार्टी होती''.

''मला लग्नाआधी सेक्स करायचा नव्हता पण मी नकार देत असतानाही त्यानं मला फसवून अनेकदा माझ्यासोबत सेक्स केलं. जुलैमध्ये जेव्हा मी त्याला कॉल केला तेव्हा एका मुलीनं तो फोन उचलला आणि तिच्याशी बोलल्यानंतर मला अभिनेत्यावर शंका आली''.(TV Actress has accused her former co actor of rape)

अभिनेत्री पुढे म्हणाली,''जेव्हा मी अभिनेत्याला त्या मुलीविषयी विचारलं तेव्हा मला तो म्हणाला की ती मुलगी फक्त त्याची जवळची मैत्रिण आहे. पण १६ ऑक्टोबरला त्याच्या वाढदिवशी त्या मुलीनेच पार्टी आयोजित केली आणि मी तिथे गेली असताना चुकीची वागणी देत मला घराबाहेर केलं''.

''हळूहळू मला कळालं की मला तो धोका देत आहे आणि मी त्याला स्पष्ट सांगितलं की मला त्याच्यासोबत नात्यात रहायचं नाही. त्यानंतर तो मला धमक्या देऊ लागला आणि त्यानं माझे घेतलेले पैसे देखील अद्याप परत केलेले नाही''.

त्यानंतर अभिनेत्रीनं म्हटलं,''१३ मार्च २०२३ रोजी मी बांगर नगर लिंक रोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. त्यानंतर अभिनेत्यानं देखील माझ्याविरोधात गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली की मी त्याला त्रास देत आहे आणि त्यानं माझ्यासोबत तो रिलेशनशीपमध्ये होता याचा देखील विरोध केला''.

'' मी त्याच्याविरोधात माझ्या व्यावसायिक प्रतिमेला मलिन केल्याबद्दल आणि लग्नाचं आमिष दाखवून माझा फायदा उठवल्याबद्दल कायदेशीर कारवाई केली आहे. ५ एप्रिल रोजी गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये मी त्याच्या विरोधात बलात्काराची केस दाखल केली आहे''.

रिपोर्टनुसार कळतंय की आरोपी अभिनेत्याच्या वकीलानं हे सगळे आरोप अर्थहीन आहेत असं म्हटलं आहे. अभिनेत्याचे वकील म्हणाले,''आम्ही हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे. अभिनेत्यानं अभिनेत्रीला कधीच स्पर्श केलेला नाही,त्यामुळे बलात्काराचा प्रश्ननच उठत नाही''.

''ऑक्टोबर २०२२ मध्ये अभिनेत्रीने अभिनेत्यासमोर आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली होती,ज्यानंतर अभिनेत्यानं तिच्यापासून दूर रहायचं ठरवलं. अभिनेत्रीला माहित होतं की अभिनेता आधीपासूनच रिलेशनशीपमध्ये आहे,पण तरिदेखील ती त्याला भेटण्यासाठी जबरदस्ती करायची''.

यानंतर आता अभिनेत्रीच्या वकीलाच्या म्हणण्याप्रमाणे आरोपी अभिनेत्याचा जामिन रद्द करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: छत्रपती संभाजीनगर कन्नड प्रभागातील नगरसेवक पदासाठी चिट्ठी काढून निर्णय, दोन उमेदवारांना समान मतं

साताऱ्यात दोन्ही राजेंना अपक्ष उमेदवाराचा दे धक्का, प्रभाग एकमध्ये अपक्षाने उधळला गुलाल

Shirol Nagar Palika Result : आमदार अशोकराव मानेंचा मुलगा, सून दोघांचाही दारूण पराभव, शिरोळकरांनी घराणेशाही मोडीत काढली...

Nagar Parishad Election Result : शिरोळमध्ये विद्यमान आमदारांना तगडा झटका, यड्रावकर–माने गटाची सत्ता संपुष्टात, मुरगूड–कागल–गडहिंग्लजमध्ये आघाड्यांचे वर्चस्व

Manchar Nagar Panchayat Election Result 2025: मंचर नगराध्यक्षपदाची अटीतटीची लढत; दुसऱ्या फेरीअखेर शिवसेना आघाडीवर

SCROLL FOR NEXT