Mukesh Khanna News | Shaktiman News esakal
मनोरंजन

Mukesh Khanna: तीनशे कोटींचा ‘शक्तिमान’, सोनी पिक्चर्सची निर्मिती

भारतीय टीव्ही मनोरंजनाच्या इतिहासात आपला वेगळा ठसा उमटविणारी मालिका म्हणून शक्तिमानचे नाव घेतले जाते.

युगंधर ताजणे

Tv entertainment news: भारतीय टीव्ही मनोरंजनाच्या इतिहासात आपला वेगळा ठसा उमटविणारी मालिका म्हणून शक्तिमानचे नाव घेतले (Shaktiman Movie) जाते. या मालिकेनं गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे. 90 च्या दशकातील या मालिकेची लोकप्रियता प्रचंड होती. त्याच शक्तिमान मालिकेवर चित्रपट निर्मितीची (bollywood actors) घोषणा प्रसिद्ध अभिनेते शक्तिमान फेम मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी केली होती. जगप्रसिद्ध सोनी कंपनीच्या वतीनं या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. असे सांगण्यात आले आहे. खन्ना यांनी एका ठिकाणी दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी अधिक माहिती दिली आहे.

बी आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेतून भीष्म पितामह यांची भूमिका (Bollywood directors) करणाऱ्या मुकेश खन्ना यांना लोकप्रियता मिळाली. मात्र त्यांनी जेव्हा शक्तिमान ही मालिका केली त्यात गंगाधर आणि शक्तिमानच्या केलेल्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. भारतातील सर्वात गाजलेल्या मालिकांमध्ये शक्तिमानचा क्रमांक हा सर्वात वरचा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांना या मालिकेनं वेड लावलं होतं. सध्या मुकेश खन्ना हे काही सामाजिक कामांमध्ये सक्रिय झाले आहेत. मोफत शिक्षण व्यवस्था, गरिबांना आरोग्य आणि शिक्षणाच्या सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून त्यांनी काही प्रोजेक्ट सुरु केले आहेत.

खन्ना यांच्या सामाजिक कामांच्या दरम्यान शक्तिमान चित्रपटाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून आले आहे. अमर उजालानं त्यांची याबाबत सविस्तर मुलाखत देखील घेतली आहे. त्यामध्ये खन्ना यांनी आगामी काळात शक्तिमान, त्याचे चित्रिकरण आणि त्याचे बजेट याविषयी त्यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुकेश खन्ना यांची एक धार्मिक टिप्पणी चर्चेत आली आहे. त्यामध्ये त्यांनी मुस्लिम बांधव जर एका दिवशी एकत्रित येऊन नमाज पठण करत असतील, ख्रिश्चन बांधव एका दिवशी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करत असतील तर हिंदू बांधव मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे पठण का करु शकत नाही, असा प्रश्न खन्ना यांनी उपस्थित केला होता.

शक्तिमान या मालिकेविषयी खन्ना म्हणाले, सोनी पिक्चर्सच्या वतीनं हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याचे बजेट तीनशे कोटींच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले आहे. मला शक्तिमानचा दुसरा पार्ट टीव्हीवर घेऊन या असे अनेकांनी म्हटले होते. पण मला त्यात रस नव्हता. अनेक वर्षानंतर हा प्रोजेक्ट माझ्याकडे आला आहे. लवकरच त्याच्या निर्मितीला सुरुवात होईल असेही खन्ना यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Cold Wave : महाराष्ट्रातील थंडीची लाट ओसरणार? हवामान विभागाचा असा असेल पुढील अंदाज

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर; द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न

Sangli Politics : 'महापालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार'; जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांची मोठी घोषणा

माेठी बातमी! सातारा जिल्ह्यातील ड्रग्‍ज प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे?; विशाल मोरेसह सात जणांना अटक, कोण आहे सलीम डोला?

Railway : पुणे-मुंबई-पुणेची ‘प्रतीक्षा’ संपली; लोणावळ्यात लोहमार्गाचे विस्तारीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT