Tv Production Company Directors yash patnaik mamta  
मनोरंजन

Income Tax भरायला चुकले, प्रसिद्ध निर्माते जेलमध्ये गेले!

मुंबईतील विशेष न्यायालयानं आता टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध निर्माते आणि त्यांच्या कंपनीला मोठा दंड ठोठावल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

TV production company and its directors Yash Patnaik and Mamta Patnaik have been sentenced : मुंबईतील विशेष न्यायालयानं आता टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध निर्माते आणि त्यांच्या कंपनीला मोठा दंड ठोठावल्याचे दिसून आले आहे. त्यांनी इन्कम टॅक्स भरण्यात दिरंगाई केल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दिग्दर्शक यश पटनाईक आणि ममता पटनाईक यांनी त्यांच्यावरील ८.३७ कोटींचा कर थकवल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

कोर्टानं संबंधित दिग्दर्शकांना तीन महिन्यांचा तुरुंगवास ठोठावला आहे. आयकर विभागाच्या वतीनं ही तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये निर्माते आणि दिग्दर्शक यांनी तो कर न भरल्याचे तपासणीत दिसून आले आहे. याशिवाय त्यांना पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. जर तुम्हाला इन्कम टॅक्स भरण्यासंबंधी नोटीस आली होती तर त्यातील मुदतीमध्ये ती रक्कम भरणे गरजेचे होते.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आरोपींनी तो दंड भरलेला नाही हे दिसून आले आहे. त्यांच्यावर इन्कम टॅक्स अॅक्ट नुसार कारवाई देखील करण्यात आली आहे. आयकर विभागाच्यावतीनं तीन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. संबंधित ज्या दिग्दर्शकावर कारवाई करण्यात आली आहे त्यांनी वेगवेगळ्या मालिकांची निर्मिती केली आहे. सरकारी वकील अमित मुंढे यांनी यावेळी प्रशासनाच्यावतीनं बाजू मांडली.

याचिकाकर्त्यांनी आपली कंपनी आणि दिग्दर्शक यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये त्यांनी तो कर भरण्यास विलंब केल्याचे दिसून आले. याशिवाय त्यांनी ज्यावेळी नोटीस आली त्याचवेळी त्याला उत्तरही पाठवले होते. असे युक्तिवादात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Latest Marathi News Update : सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

Mumbai Pune Journey : कोण कोणाच्या गळाला लागणार? विश्वजित कदमांची भाजपसोबतची जवळीक पुन्हा चर्चेत; मुख्यमंत्र्यांसोबतच्या मुंबई ते पुणे प्रवासाने रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT