Devoleena Bhattacharjee secret wedding with gym trainer shahnawaz sheikh  Google
मनोरंजन

T.V च्या प्रसिद्ध 'गोपी बहू' नं केलं सीक्रेट मॅरेज, कोण आहे देवोलिना भट्टाचार्जीचा लाईफ पार्टनर?

बिग बॉस फेम विशाल सिंगसोबत देवोलिना भट्टाचार्जीचं अफेअर सुरु आहे अशा बातम्या जोर धरुन असताना अचानक अभिनेत्रीच्या लग्नानं चाहत्यांना मात्र धक्का बसला आहे.

प्रणाली मोरे

Devoleena Bhattacharjee Wedding: 'साथ निभाना साथिया' अभिनेत्री दवोलिना भट्टाचार्जी सध्या आपल्या सीक्रेट वेडिंगमुळे जोरदार चर्चेत आली आहे. १३ डिसेंबरला देवोलिनाच्या हळदी आणि मेहेंदीचे फोटो समोर आले होते. तर १४ डिसेंबरला आज नववधूच्या पेहरावात तिनं आपले फोटो शेअर केले आहेत. आता हे कन्फर्म झालं आहे की देवोलिनाचे लग्न झाले आहे. अर्थात,गेल्या काही दिवसांत तिचा पती कोण हे एक मोठं रहस्य बनून राहिलं होतं. आता सगळ्यांसमोर त्याचा खुलासा झाला आहे अन् देवोलिनाचं सीक्रेट वेडिंग समोर आलं आहे.(Tv Serial: Devoleena Bhattacharjee secret wedding with gym trainer shahnawaz sheikh)

देवोलिना भट्टाचार्जी ही छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. देवोलिना आधी अनेकांनी सीक्रेट वेडिंग केलं आहे. पण आतापर्यंत कोणी आपल्या होणाऱ्या बायकोचा किंवा नवऱ्याचा चेहरा लपवून ठेवला नव्हता. आता चर्चा आहे की देवोलिनाने शहनवाज शेख नामक व्यक्तीसोबत लग्न केलं आहे.

हेही वाचा- संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

शहनवाज शेख हा व्यवसायाने जीम ट्रेनर आहे. बिग बॉस १३ दरम्यान देवोलिना भट्टाचार्जीनं आपल्या प्रेमाची कबूली दिली होती. पण तेव्हा ती व्यक्ती कोण हे मात्र तिनं गुलदस्त्यात ठेवलं होतं. देवोलिना आणि शहनवाजची भेट जीममध्ये झाली होती,जी जीम अभिनेत्रीच्या घराजवळच आहे. 'साथिया..' शो च्या सेटवर देवोलिनाचा अपघात झाला होता त्यादरम्यान शहनवाज देवोलिनाचा आधारस्तंभ बनला होता आणि त्यानेच तिला त्या अपघाताच्या धक्क्यातून सावरायला मदत केली होती.

शहनवाजच्या याच केअरिंग स्वभावानं देवोलिनाचं मन जिंकलं. यानंतर कपलने जवळपास २ वर्ष एकमेकांना डेट केलं. आणि आता लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नवीन पर्वाला सुरुवात केली आहे.

देवोलिना आणि विशाल सिंग दोघंही खूप चांगले मित्र आहेत. या दोघांमधील बॉन्ड पाहून वाटायचं की हे दोघे एकमेकांना डेट करत असतील, पण अनेकदा दोघांनी आपण चांगले मित्र आहोत हे स्पष्ट केलं. देवोलिनाच्या लग्नात विशाल सिंग तिचा बेस्ट फ्रेंड म्हणून सहभागी झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT