Urfi Javed Esakal
मनोरंजन

Urfi Javed: बॉलीवूडच्या या अभिनेत्यासाठी उर्फी झाली वेडी! त्याच्यामुळेच अजुनही मी....

सकाळ डिजिटल टीम

उर्फी जावेद ही तिच्या कामापेक्षा जास्त तिच्या फॅशन आणि वादामुळं जास्त चर्चेत असते. कोणी कितीही बोला, तिला विरोध करा किंवा ट्रोल करा ती काही तिची फॅशन दाखवणं बंद करणार नाही. उर्फी आता चर्चेतलं नावं झाली आहे. ती फॅशन व्यतिरिक्त तिच्या वक्तव्यामुळेदेखील खुप चर्चेत असते. कुणाचाही क्लास घेतांना ती पुढे मागे बघत नाही. तिचं मत ती मांडत असते.

उर्फी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. ती कुणाला डेट करत नसून ती सिंगल असल्याच सांगते. मात्र उर्फीही एकेकाळी कुणाच्या तरी प्रेमात वेडी होती. ती त्या अभिनेत्यासाठी इतकी क्रेझी झाली होती की त्याच्याशी लग्न देखील करण्याची तिची इच्छा होती.

नुकताच तिनं एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली. उर्फीचा क्रश हा अभिनेता दुसरा कोणी नसून लाखो मुलींचा क्रश शाहिद कपूर आहे. उर्फीचा शाहिदवर मोठा क्रश होता. ती त्याच्या प्रेमात इतकी वेडी होती की जेव्हा तिला शाहिदच्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा ती दु:खी झालीआणि खूप रडली.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Urfi Javed

याविषयी तिने उर्फी जावेदने इन्स्टा स्टोरीवर एक पोस्टही शेअर केली आहे. यात तिने लिहिलं की, “२० वर्षांपूर्वी अगदी ९ मे रोजी जेव्हा इश्क विश्क प्रदर्शित झाला आणि त्यांनतर मी शाहिद कपूरवर प्रेम करू लागलो. मी त्यांचं नाव लिहित १०० डायरी भरवल्या आहेत.

मी माझ्या खोलीत शाहिदचे 100 पोस्टर्स लावले होते. तिचे लग्न झाल्यावर मी खूप रडली होती. कदाचित हेच कारण असेल की मी इतर कोणत्याही व्यक्तीसोबत राहू शकले नाही.

माझे आयुष्य 20 वर्षांपूर्वी बदलले. हा चित्रपट माझ्यासाठी गेम चेंजर ठरला. त्यातील डायलॉग आणि गाणी आजही समर्पक आहेत."

"इश्क विश्क" हा 2003 चा हिंदी भाषेतील टीन रोमान्स चित्रपट आहे . यात शाहिद कपूरने अमृता राव आणि शहनाज ट्रेझरीवाला यांच्यासोबत चित्रपटसृष्टीत पदार्पणात केलं होतं. 'इश्क विश्क' हा चित्रपट हिट ठरला होता. यामुळेच शाहिद कपूर आणि अमृता राव या दोघांच्याही करिअरची सुरुवात झाली. त्यानंतर शाहिद हा लाखो मुलींचा क्रश झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शैक्षणिक सहलींसाठी विद्यार्थ्यांसाठी सहलीत ५० टक्के सवलत; प्रत्येकास १० लाखांचा अपघात विमाही; एसटी महामंडळाचे आगारप्रमुख जाणार शाळांमध्ये

आजचे राशिभविष्य - 19 नोव्हेंबर 2025

Horoscope Prediction : आज तयार होतोय अमला राजयोग; मेष आणि या पाच राशींच्या आर्थिक अडचणींना लागणार पूर्णविराम !

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात रवा पिझ्झा बॉल ट्राय केले का? लगेच लिहून घ्या रेसिपी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT