Madhuri Dixit, Urfi javed Controversy Esakal
मनोरंजन

Madhuri Dixit विषयी उर्फी जावेदचा हैराण करणारा दावा; म्हणाली,'हिच्यामुळेच आयत्यावेळी मला..'

माधुरी दिक्षितवर आरोप करत उर्फी जावेदनं पोस्ट शेअर केली आहे.

प्रणाली मोरे

Urfi javed Controversy: अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद हिचं वादांशी खूप जुनं नातं आहे. कधी तिच्या कपड्यांवरनं तर कधी वादग्रस्त विधानं केल्यामुळे ती चर्चेत येते. अनेकदा तर वादांमध्ये अशीअडकते की त्याचं थेट राजकारण होतं. आता तिनं माधुरी दिक्षितविषयी असा दावा केलाय जो ऐकून सगळेच हैराण झाले आहेत.

उर्फी जावेदनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सांगितलं आहे की तिला ग्लोबल एक्सेलेन्स पुरस्कार सोहळ्यात निमंत्रित केलं गेलं होतं,पण ऐनवेळी तिचं निमंत्रण रद्द करण्यात आलं. याव्यतिरिक्त उर्फीनं पोस्टमध्ये माधुरी दिक्षितचा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि तिच्या नावाचा उल्लेख देखील केला आहे. (Urfi javed says award organiser canceld her invitation due to madhuri dixit )

उर्फी जावेदनं इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीन शॉट ट्वीटरवर शेअर केला आहे,ज्यात तिनं लिहिलं आहे,''या पुरस्कार सोहळ्याविषयी एक मजेदार गोष्ट सांगते. मला आधी निमंत्रण देण्यासाठी माझ्या टीमशी संपर्क साधला. मी निमंत्रण स्विकारलं. माझे इतर प्लॅन कॅन्सल केले. आऊटफिटची सोय केली. आणि ऐनवेळी त्यांनी माझ्या टीमला सांगितलं की मला निमंत्रण नाही''.

उर्फी जावेद म्हणाली की,'' जेव्हा माझ्याकडून याचं कारण विचारलं गेलं तेव्हा पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांनी सांगितलं की माधुरीच्या गेस्ट लिस्टमध्ये मी नाही''.

उर्फी म्हणाली,''हे किती न पटण्यासारखं कारण दिलं आहे''.

उर्फीनं निमंत्रण ऐनवेळी कॅन्सल केल्याविषयी राग व्यक्त केला आहे. ती पुढे म्हणाली, ''मी काही त्या पुरस्कार सोहळ्यात जाण्यासाठी अतिउत्सुक नव्हती..का तिथं न गेल्यानं मी मरणार होते..पण आधी बोलवायचं आणि मग ऐनवेळी नकार द्यायचा हे कसलं वागणं''.

ग्लोबल एक्सलेंस पुरस्कार सोहळ्यात टी.व्ही मधील अनेक बड्या कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहोळ्यात माधुरी दिक्षित देखील पोहोचली होती. अर्थात उर्फीनं केलेल्या आरोपानंतर अद्याप माधुरी दिक्षित किंवा पुरस्कार सोहोळ्याच्या आयोजकांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. या सोहोळ्यात शालीन भनोट,सुंबुल तौकीर, शिवांगी जोशी, प्रियंका चाहर चौधरी सारख्या अनेक टी.व्ही जगतातील कलाकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT