Urfi Javed Esakal
मनोरंजन

Urfi Javed: पुढे पाठ अन् मागे...उर्फीने पुन्हा सादर केला तिच्या अकलेचा नमुना

सकाळ डिजिटल टीम

Urfi Javed Video: उर्फी जावेद ही तिच्या कामापेक्षा जास्त तिच्या फॅशन आणि वादामुळं जास्त चर्चेत असते. कोणी कितीही बोला , विरोध करा किंवा ट्रोल करा ती काही तिची फॅशन दाखवणं बंद करणार नाही. उर्फी आता चर्चेतलं नावं झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालण्याच्या आरोप करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर टिका केली. त्यांनतर दोघींमध्ये चांगलाच वाद रंगला.

त्यानंतर काही दिवसांनी चित्रा वाघ यांनी उर्फीचं कौतुक केलं कारण ती चांगल्या कपड्यामध्ये दिसली होती. पण उर्फीनं तिची फॅशन दाखवणं काही सोडलेलं नाही.

उर्फी जावेदने नुकताच तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती न्यू ड्रेस मध्ये दिसत आहे, ज्यामध्ये तिनं समोरून काही आणि मागून काही वेगळंच परिधान केललं दिसत आहे. तिचा ड्रेस समोरून टापटिप दिसत आहे, पण त्याचा मागचा फोटो पाहून लोक हैराण झाले आहेत.

तिने शेअर केलेल्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये ती अतरंगी वेट्रेस बनली आहे. तिने पांढरा शर्ट घातला आहे. खाली काळ्या रंगाचा लांब स्कर्ट आहे. या लूकमध्ये उर्फी एका छान रेस्टॉरंटच्या वेट्रेससारखी दिसत आहे. पण या फॅशनमध्ये ट्विस्ट इथेही आहे.

उर्फी समोरून पूर्णपणे तिने शरीर कपड्याने झाकलेले आहे. पण तिच्या पाठीमागे खरी फॅशन केली आहे. तिने मागून बिकिनी घातली आहे. तिचा हा फॅशन सेन्स पाहून चाहत्यांचे हैराण झाले आहेत.उर्फीने या लूकमध्ये बोल्डनेसचा टच दिला आहे आणि लोकांना आश्चर्यचकित केले आहे. व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता की उर्फीचा ड्रेस पुढे वेगळा आणि मागे वेगळाच दिसत नाही आणि ती आरशात तिची फिगर दाखवताना दिसत आहे.

नेहमी प्रमाणे उर्फीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि नेटकरी तिच्या व्हिडिओला कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलेय, 'पीछे तो देखो' . दुसरीकडे, दुसर्‍या युजरने लिहिले की, 'जसं टेलरला समजलं की हा उर्फीचा ड्रेस आहे, त्याने मागचा कापडच लावला नाही.' मात्र, काहींना त्याची सर्जनशीलता आवडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT