vaalvi, vaalvi on OTT,  SAKAL
मनोरंजन

Vaalvi: थिएटरमध्ये पाहता नाही आला म्हणून होऊ नका निराश.. या तारखेला 'वाळवी' येतोय OTT वर

परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' या मराठी सिनेमाची प्रचंड हवा झाली

Devendra Jadhav

Vaalvi Marathi Movie On OTT: परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' या मराठी सिनेमाची प्रचंड हवा झाली. वाळवी पाहण्यासाठी थिएटर मध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली. हा सिनेमा आजही महाराष्ट्रातल्या अनेक थियटरमध्ये प्रेक्षकांच्या प्रतिसादात गाजला.

रितेश देशमुखच्या 'वेड' नंतर वाळवी सुद्धा मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला. परंतु काही प्रेक्षकांना वाळवी थिएटरमध्ये पाहता आला नाही.

पण त्यांनी निराश व्हायचं कारण नाही. वाळवी आता OTT वर रिलीज होणार आहे.

(vaalvi marathi movie released on zee 5 on this date )

वाळवी आता घरबसल्या पाहता येणार आहे. वाळवी कधी आणि कुठे पाहता येणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर उत्तर असं आहे कि... वाळवी २४ फेब्रुवारीला झी ५ वर प्रीमियर होतोय.

त्यामुळे २४ फेब्रुवारीपासून वाळवी घरबसल्या प्रेक्षकांना OTT वर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ज्यांचा वाळवी थिएटरमध्ये पाहायचा राहिला त्यांना वाळवी २४ फेब्रुवारीपासून झी ५ वर पाहायला मिळणार आहे.

झी स्टुडिओजची निर्मिती असलेला वाळवी सिनेमा १३ जानेवारी २०२३ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर वाळवी अल्पावधीत लोकप्रिय झाला.

थ्रिलकॉम धाटणीचा हा सिनेमा पाहायला प्रेक्षकानीं पुन्हा पुन्हा गर्दी केली. काहीच दिवसांपूर्वी वाळवी अमेरिकेत रिलीज होऊन तिकडेही लोकप्रिय झाला.

वाळवीच्या सक्सेस पार्टीत झी स्टुडिओजचे हेड मंगेश कुलकर्णी यांनी वाळवी च्या पुढच्या भागाची म्हणजेच वाळवी २ ची घोषणा केली.

झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी 'वाळवी'ची निर्मिती केली असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत.

स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT