paresh mokashi. madhugandha kulkarni, vaalvi
paresh mokashi. madhugandha kulkarni, vaalvi SAKAL
मनोरंजन

बर्लिनमध्ये मराठी सिनेमाचा डंका .. टाळ्यांचा कडकडाट थांबलाच नाही, लेखिकेने शेअर केला हृदयस्पर्शी अनुभव

Devendra Jadhav

Atmapamphalet Movie News: परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मधुगंधा कुलकर्णी लिखित वाळवी सिनेमा सुपरहिट झाला. वेड नंतर वाळवीने मराठी प्रेक्षकांना थिएटरमध्ये येण्यास भाग पाडलं.

मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी या नवरा - बायकोच्या जोडीने त्यांच्या करियरमध्ये अजून एक चांगला सिनेमा दिलाय.

वाळवी नंतर परेश मोकाशी यांचा 'आत्मपॅम्फ्लेट' सिनेमाचं बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रीनिंग झालं. त्यावेळी आलेला अनुभव मधुगंधा कुलकर्णी यांनी शेयर केलाय.

(Vaalvi writer Madhugandha Kulkarni recounts a 'different' experience in berlin film festival)

मधुगंधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिलंय कि.. बर्लिन मध्ये अमराठी लोकांनी Atmapamphalet इतकी एन्जॉय केली की सिनेमा संपल्यानंतरही खूप काळ टाळ्यांचा गजर चालूच होता!

आपली मराठी माणसं, आपला देश ह्याचं कौतुक मोलाचं आहेच पण ज्यांना भाषा कळतच नाही त्यांची दाद म्हणजे सिनेमा भाषेच्या पलीकडे जावून भावला असल्याचा संकेत आहे .

परेश मोकाशी लिखित आत्मपॅम्फ्लेट सिनेमाचं पोस्टर आऊट झालंय. या पोस्टरमध्ये एका तरुण मुलाने त्याच्या तोंडावर फेस लावला असून तो त्याचं तोंड कापण्याच्या तयारीत आहे. परेश मोकाशी यांनी हा सिनेमा लिहिला आहे.

'आत्मपॅम्फ्लेट' या चित्रपटाची 'जनरेशन १४ प्लस' स्पर्धेसाठी निवड झाली असून त्याचा प्रीमियर ७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला. त्यानिमित्ताने मधुगंधा कुलकर्णी परेश मोकाशी सोबत बर्लिन फिल्म फेस्टिवलला गेल्या होत्या.

'आत्मपॅम्फ्लेट' चा बर्लिन फिल्म फेस्टिवल मधील प्रीमियर शो हाऊसफुल्ल झाला होता. २२ फेब्रुवारीला सिनेमाचं स्क्रीनिंग करण्यात आलंय. परेश मोकाशी यांनी या सिनेमाच्या लेखनाची जबाबदारी घेतली असून आशिष बेंडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.

हा सिनेमा महाराष्ट्रात रिलीज कधी होणार याविषयी निश्चित माहिती समोर आली नाही. पण लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मधुगंधा कुलकर्णी लिखित वाळवी सिनेमा आज २४ फेब्रुवारीपासून झी ५ वर रिलीज झालाय. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत.

स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT