Varun Dhawan and Anil Kapoor reuniting for remake of THIS David Dhawan movie? Google
मनोरंजन

अनिल कपूरच्या 'या' सुपरहिट सिनेमाच्या Remake मध्ये वरुणला करायचे आहे काम

'जुग जुग जियो' सिनेमाच्या मुलाखतीच्या निमित्तानं वरुण धवननं अनिल कपूर समोरच आपली ही इच्छा बोलून दाखवली आहे.

प्रणाली मोरे

'जुग जुग जियो'(Jug Jug Jiyo) या सिनेमात वरुण धवन(Varun Dhawan) आणि अनिल कपूर(Anil Kapoor) यांच्या जोडीनं धम्माल उडवून दिली आहे. दोघांनी एकमेकांसोबत काम करणं खूप एन्जॉय केलं असं अनेक मुलाखतीतून बोलून दाखवलं. आता वरुण धवनला अनिल कपूर यांच्या सुपरहिट सिनेमाच्या रीमेकमध्ये काम करायचं आहे. त्यासाठी तो त्या सुपरहिट सिनेमाच्या दिग्दर्शकाचीही परवानगी घेणार नाही असं बोलला आहे. कोणता आहे तो सिनेमा?(Varun Dhawan and Anil Kapoor reuniting for remake of THIS David Dhawan movie?)

डेव्हिड धवनचा सुपरहिट सिनेमा 'दिवाना-मस्ताना' हा एव्हरग्रीन सिनेमा आहे. आजही टी.व्ही वर हा सिनेमा लागला की तितक्याच आवडीनं तो पाहिला जातो. अनिल कपूर- गोविंदाच्या अभिनयाच्या जुगलबंदीला प्रेक्षकांनी भलतंय एन्जॉय केलं होतं. जुही चावलानेही या दोघांना तितकीच छान साथ दिली होती. शेवटी सलमानची एन्ट्री देखील भाव खाऊन गेली होती. आता चर्चा आहे की डेव्हिड धवनच्या या सुपरहिट सिनेमाचा रिमेक बनतोय अन् यात अनिल कपूर असला तरी गोविंदाच्या नावाची मात्र दूरदूर पर्यंत चर्चा नाही. मात्र वरुण धवनचं नाव 'दिवाना-मस्ताना'च्या रीमेक सोबत जोडलं जात आहे. चला जाणून घेऊया याविषयी विस्तारितपणे.

वरुण धवन आणि अनिल कपूर ही जोडी नुकतीच आपल्याला करण जोहरच्या 'जुग जुग जियो' सिनेमात धमाल करताना दिसली. आता पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसणार असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. एका वेबसाईटशी 'जुग जुग जियो' सिनेमाच्या निमित्तानं मुलाखत देत असताना वरुण धवनला एक प्रश्न विचारला गेला होता की, 'अनिल कपूरच्या कोणत्या सिनेमाच्या रीमेकमध्ये त्याला काम करायला आवडेल?' तेव्हा अनिल कपूरसोबत वरुणनेही काही सिनेमांची नावं पटकन सांगितली. पण अचानक एकदम दोघांनी एक नाव एकाच वेळेस घेतलं ते म्हणजे 'दिवाना मस्ताना'. जो सुपरहिट सिनेमा वरुणच्या वडीलांनी म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केला होता. यासाठी डेव्हिड धवन यांची परवानगी देखील काढायला नको असं वरुणनं यावेळी स्पष्ट केलं.

दिवाना मस्ताना या सिनेमात अनिल कपूर,गोविंदा,जुही चावला अशा कलाकारांनी काम केलं आहे. तर सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. सिनेमानं बॉक्सऑफिसवर त्यावेळी तुफान कमाई केली होती.

वरुण धवन,अनिल कपूर यांच्या 'जुग जुग जियो' सिनेमाचं दिग्दर्शन राज मेहतानं केलं आहे. यामध्ये कियारा अडवाणी,नीतू कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमानं प्रेक्षकांसोबत समिक्षकांचीही पसंती मिळवली आहे. सुरुवातीला ओपनिंग शो ला फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी आता माऊथ पब्लिसिटीनंतर सिनेमानं जोर धरला आहे. बॉक्सऑफिसवर सिनेमा हळूहळू का होईना पण कमाई करतोय असं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT