Very Clever Of Chandgad
Very Clever Of Chandgad 
मनोरंजन

‘विच्छा माझी पुरी करा’ तून चंदगडची पोरं हुश्शारचा संदेश

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर  : राज्य नाट्य स्पर्धा, कोल्हापूर केंद्र आणि वसंत सबनीस यांचं ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक हे एक तसं अतूट समीकरण. अनेक संस्थांनी यापूर्वीही हे नाटक स्पर्धेत सादर करत बक्षिसांची लयलूट केली. नाट्यसंपदा संस्थेने २०११ साली हेच नाटक तब्बल २० वर्षांनी व्यावसायिक रंगभूमीवर आणताना येथील अभिनेता संजय मोहिते यांना प्रमुख भूमिका दिली. यंदाच्या स्पर्धेत हलकर्णी (ता. चंदगड) येथील श्री साई नाट्यधारा मंडळाच्या टीमनं याच नाटकाचा दिमाखदार प्रयोग सादर करत ‘चंदगडची पोरं हुश्शार’ असाच जणू संदेश दिला. 

चंदगड तालुक्‍यात नाटक जपण्यासाठी ही पाच - सहा मित्रमंडळी सतत वेगवेगळे प्रयोग करत असतात. कुणी शिक्षक, कुणी फिल्म इंडस्ट्रीत करिअर करू पाहणारे, कुणी अजूनही शिकणारे, तर कुणी पारंपरिक शेती व्यवसाय करणारे; पण आपापल्या कामाच्या निमित्ताने सर्वत्र विखुरलेली. राज्य नाट्य स्पर्धेचे बिगुल वाजले, की या मंडळींची एंट्री ठरलेली. सारं काही फोनवरूनच ठरतं आणि ठरल्याप्रमाणे कुठे असेल तेथून ही मंडळी थेट निघतात आणि चंदगड गाठतात.

एका देखण्या प्रयोगाचा अनुभव

पुढे दहा दिवस मग सराव तालमी आणि त्यानिमित्तानं नाटकं जगतात. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवरील मानाचं पान आणि त्यातही अनेक दिग्गजांनी या नाटकात भूमिका केलेल्या. अभिनय, गाणं आणि नृत्याचा अनोखा संगम साधताना इथे ध्वनी-प्रकाशाचा खेळही नीटच जमावा लागतो. दिग्दर्शक परसू गावडे आणि त्यांच्या टीमनं तो अगदी सफाईदारपणे जमवला आणि एका देखण्या प्रयोगाचा अनुभव दिला. 
 

भाषेवर विशेष लक्ष देणार

चंदगड तालुक्‍यात रंगभूमीवर आम्ही सतत वेगळे प्रयत्न करत असतो. गेल्या वर्षीपासून चंदगडी नाट्य महोत्सवाला प्रारंभ केला आहे. यंदाही त्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र, कर्नाटक, गोवा आणि सिंधुदुर्गच्या सीमेवर आम्ही. त्यामुळे भाषेची अडचण बऱ्याचदा येते. त्यामुळे आता आम्ही भाषेवरच अधिक लक्ष केंद्रित करणार आहोत. एप्रिल आणि मे महिन्यात त्यासाठी विशेष कार्यशाळा घेऊन तज्ज्ञांशी चर्चा घडवून आणणार आहोत. 

-परसू गावडे 

गावातून उर्जा मिळते

आम्ही तुरुकेवाडीचे. दोघांनीही करिअरसाठी  मुंबई गाठली आहे. फिल्म इंडस्ट्रीत जम बसवण्यासाठी तेथेच स्थायिक झालो आहोत. मात्र, स्पर्धेच्या नाटकाच्या निमित्ताने आम्ही किमान दहा ते पंधरा दिवस वेळ काढून गावाकडे येतोच येतो. कारण त्यातून मिळणारी सळसळती ऊर्जा पुढच्या प्रवासात मोठा ‘कॉन्फिडन्स’ देणारी ठरते. 
- विजय मोरे , प्रियदर्शनी फलके 

पात्र परिचय : 
परसू गावडे (हवालदार), विजय मोरे (शिपाई), आत्माराम पाटील (राजा), सुशांत सावंत (प्रशांत), अनिल कांबळे (कोतवाल), प्रियदर्शनी फलके (मैनावती), मीनाक्षी दोडमणी, वर्षा कांबळे, विद्या मोरबाळे, शाहिस्ता मकानदार (गवळण), प्रा. आनंद बल्हाळ, अंकुश सावंत (कलाकार).
 

  •  दिग्दर्शक  :परसू गावडे
  •   प्रकाशयोजना  :रोशन कुंभार
  •   रंगभूषा  :सदानंद सूर्यवंशी
  •   वेशभूषा :श्रीधर कुंभार
  • ढोलकी : सचिन पन्हाळकर
  •   गायक :सीताराम जाधव
  •  नेपथ्य :राम गुरव, महादेव कांबळे

राज्य नाट्य स्पर्धेच्या अन्य बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT