vicky kaushal, sara ali khan, csk vs gt, ipl final 2023 SAKAL
मनोरंजन

IPL CSK Win: धोनीची CSK जिंकल्यावर विकीने डोक्याला हातच लावला, धम्माल व्हिडिओ एकदा पाहाच, Video Viral

IPL Final Csk Vs GT पाहायला विकी कौशल आणि सारा अली खान उपस्थित होते.

Devendra Jadhav

IPL 2023 Final CSK vs GT News: आयपीएल 2023 ची फायनल फारच रंगतदार झालीय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला.

अंतिम सामन्याच्या शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलपर्यंत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर रवीन्द्र जडेजाने शेवटच्या बॉलमध्ये २ बॉल मध्ये १० धावा काढत चेन्नईला जिंकवले. हा सामना पाहायला विकी कौशल आणि सारा अली खान उपस्थित होते.

(vicky kaushal and sara ali khan celebrate winning moment of csk ip 2023 against gt)

विकी कौशल आणि सारा अली खानचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओत CSK जिंकल्यावर विकी कौशलला सुखद धक्का बसला. अगदी त्याने डोक्यावर हात मारला.

CSK चा असा विजय होणं हे विकी साठी नक्कीच अनपेक्षित होतं. सारा सुद्धा आनंदात टाळ्या वाजवत जल्लोष करत होती. CSK जिंकल्यावर स्टेडियममध्ये फटाक्यांची आतषबाजी झाली.

विकी कौशलने हा व्हिडिओ शेयर करत स्वतःच्या भावना केल्यात. विकी लिहितो... बदले माही…लेके जो कोई सारी, दुनिया भी दे अगर।तो किसे दुनिया चाहिए!!! माही फॉर द विन!!!

जड्डू तू रॉकस्टार!!! काय मॅच झालीय! GT… स्पर्धेतील सर्वोत्तम संघ. स्पष्टपणे गेम खरा विजेता होता. #ipl2023 #iplfinal अशा भावना विकीने व्यक्त केल्या.

दरम्यान विकी कौशल आणि सारा अली खानच्या वर्क फ्रंट बद्दल सांगायचं तर... बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल यांची प्रमुख भूमिका असलेला जरा हटके जरा बचके या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यातील सारा अन् विकीच्या वेगळ्या अंदाजाचे प्रेक्षकांनी स्वागत केले आहे.

सारा अली खान आणि विकीची भूमिका असलेला जरा हटके जरा बचकेचा ट्रेलर प्रदर्शित होताच तो सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काहींनी तर या दोन्ही सेलिब्रेटींना तुमचा हा चित्रपट तरी बॉक्स ऑफिसवर चालेल अशी अपेक्षा आहे अशी टोमणाबाजी त्यांना सुरु केली आहे. याचे कारण सारा अली खानच्या यापूर्वीच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT