viral video news  esakal
मनोरंजन

Viral: नववधूनं वराच्या दिली कानफटात! स्टेजवरच झाली हाणामारी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंना नेटकऱ्यांची जोरदार पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Angry Bride Slapped The Groom सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंना नेटकऱ्यांची जोरदार पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे. त्यातील अनेक (viral video) व्हिडिओ हे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. बऱ्याचशा व्हिडिओतून समाजपयोगी संदेश मिळतो तर केवळ मनोरंजन आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी नेटकरी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करत असतात. लग्न, लग्नातील गंमती जमती, त्यातील भांडणं, रुसवे फुगवे हे यापूर्वी देखील सोशल मीडियावर व्हायरल (social media viral news) झाले आहेत. सध्या अशाच एका व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

लग्न लागणार तोच नववधु आणि वधुमध्ये झालेल्या वादानं टोकं गाठलं. त्याची परिणीती भांडणात झाल्याचे दिसून आले आहे. सध्या त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ (Funny Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वधूनं वराला मिठाई भरवली. त्यानंतर त्यांच्यात हाणामारीच सुरु झाली. स्टेजवरच झालेल्या या हाणामारीनं उपस्थितांची तर बोबडीच वळली. त्यांनी लग्नातून काढता पाय घेतल्याचे दिसून आले. मुलगी सासरी जाताना आई वडिलांना होणाऱ्या वेदना या जगजाहीर आहेत. आपण आपली मुलगी कुणाला देत आहोत नवरा मुलगा चांगल्या रीतीनं तिचा सांभाळ तर करेल ना, असा प्रश्न आई वडिलांना पडल्याशिवाय राहत नाही. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमधील नवऱ्या सारखा तो मुलगा असेल तर आई वडिल मुलगी देताना हजारदा विचार करतील.

त्या व्हिडिओच्या पहिल्या दृश्यात वर वधुची वाट पाहतो आहे. बराच वेळ झाला पण वधु येत नाही म्हटल्यावर तो तिच्यावर रागावतो. वधु त्याला मिठाई खाऊ घालते. त्यावेळी तो नकार देतो. ती बळजबरीनं त्याला मिठाई भरवते. यानंतर चिडलेल्या वरानं तिला मारण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते. ही मारहाण भर लग्नात स्टेजवर सुरु झाल्यानं वऱ्हाडी मंडळींना देखील काय बोलावं हे कळत नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगानं व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. त्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यावेळी ती मारहाण पाहून काहींनी मध्यस्थी कऱण्याचा प्रयत्न केला. मात्र रागाच्या भरात वर कुणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले आहे. त्यानं मारहाण सुरुच ठेवल्यानं वेगळ्याच प्रकारचे मनोरंजन उपस्थितांचे झाले. अशी चर्चा लग्नमंडपात रंगली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT