Vidya Balan Speaks On Malaika Arora  esakal
मनोरंजन

Vidya Balan : 'मुलांना अजूनही मलायका आवडते, शिल्पा तर...' विद्या बालननं सांगितलं सिक्रेट

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन ही नेहमीच तिच्या बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे.

युगंधर ताजणे

Vidya Balan Speaks On Malaika Arora : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन ही नेहमीच तिच्या बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. सध्या तिचा नियत नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यावरुन तिनं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या शाळकरी मैत्रीणी मलायका आणि शिल्पा शेट्टी यांच्याविषयी खास आठवणी शेयर केल्या आहेत.

कर्ली टेल्ससोबत बोलताना विद्यानं काही आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी तिनं तिच्या नियत नावाच्या चित्रपटाविषयी देखील अनेक गोष्टी सांगितल्या. तिनं सांगितलं की, मलायकाची एक झलक पाहण्यासाठी मुलांमध्ये खूपच गोंधळ सुरु असायचा. बरेचजण रांगेत उभे थांबत असे. ती दुसऱ्या शाळेत शिकायला होती. पण फ्रेंच ट्युशन घ्यायला ती माझ्या घरासमोरुनच जात असे. त्यावेळी मुलांची खूप गर्दी होत असे.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या

याचे खरे कारण ती मुलं मलायकाला पाहायला येत असे. ती त्यावेळेपासून खूप सुंदर दिसते आहे. आजही तिचा प्रभाव आणि दिसणं हे सगळ्यांना माहिती आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटींपैकी एक म्हणून मलायकाच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. मलायकाची गोष्टच वेळी आहे. अशा शब्दांत विद्यानं तिच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शिल्पा तीन वर्षे सीनिअर होती मला...

यावेळी विद्या बालननं शिल्पा शेट्टी विषयी देखील बिनधास्तपणे प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, आम्ही दोघीजणी एकाच शाळेमध्ये होतो. ती मला तीन वर्षांनी मोठी आहे. पण ती नेहमीच शाळेतल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अॅक्टिव्ह असायची. ती एक चांगली बास्केटबॉल प्लेयरही होती. एकदा तर माझी आई देखील मला म्हणाली होती की, तू शिल्पासोबत बास्केटबॉल खेळायला काही हरकत नाही.

त्यानंतर शिल्पा ही पुढे फिल्म लाईनमध्ये गेली. मोठी अभिनेत्री झाली. आमचे फारसे बोलणे कधी झाले नाही. तिचे चित्रपट लोकप्रिय व्हायला सुरुवात झाली होती. आता ती प्रसिद्ध अभिनेत्री देखील झाली होती. मला ते दिवस नेहमीच आठवतात. शाळेतल्या दिवसांची गंमत काही वेगळीच असते. शिल्पा एक गुणवान अभिनेत्री आहे. आजही तिचा प्रभाव मोठा असल्याचे विद्यानं यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT