(Vijay Deverakonda)विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना(Rashmika Mandana) दोघेही आता केवळ दक्षिणेचे फेव्हरेट राहिले नाहीत तर हिंदी सिने-रसिकांमध्ये देखील त्यांची भरपूर क्रेझ पहायला मिळते. त्यांच्यातील क्यूट केमिस्ट्री चाहत्यांचं मन नेहमीच जिंकून घेते. ते दोघे बोलत नसले तरी चर्चा मात्र त्यांच्या अफेअरची रंगलेली अनेकदा आपल्या कानावर पडली असेल. अर्थात त्यांच्या चाहत्यांच्या मनात देखील या दोन स्टार्सनी लग्न करावं अशीच इच्छा असणार. पण त्या दरम्यान आता या स्टार्सच्या लव्हलाईफ विषयी मोठा गौप्यस्फोट झाला आहे.आणि तो ऐकल्यावर त्यांचे चाहते खट्टू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Vijay Deverakonda-Rashmika Mandana SECRET BUSTED: 2 years ago...)
या दोघांविषयी एक मोठी बातमी कानावर पडतेय की,जेव्हा रश्मिका मंदानानं साऊथ अभिनेता रक्षित शेट्टीसोबत आपला पहिला साखरपुडा मोडला होता त्यानंतर काही महिन्यातच तिच्यात आणि विजयमध्ये नवं नातं निर्माण झालं होतं. त्यावेळेस या दोघांनी एकमेकांना जवळून समजून घेण्यासाठी म्हणे २०१८ मध्ये 'गीता गोविंदम' आणि २०१९ मध्ये 'डिअर कॉम्रेड' हे सिनेमे केले होते. पण पुढे काय घडलं? रश्मिका आता सिंगल आहे. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्यात ते प्रेमाचं नातं उरलेलं नाही. पण त्यांनी आपल्यात छान मैत्री मात्र टिकवली आहे.
विजय आणि रश्मिका एकमेकांत काही वर्ष का होईना पण गुंतले होते. तो आता भूतकाळ आहे. अर्थात हे देखील तितकंच खरं आहे की जेव्हा मीडिया दोघांच्या रिलेशनशीपविषयी अफवा उठवते तेव्हा मात्र दोघेही त्यावर काहीच बोलत नाहीत. ते याचा विरोधही करताना दिसत नाहीत.
उलट, नुकत्याच एका मुलाखतीत विजय म्हणाला होता,''रश्मिका माझी डार्लिंग आहे''. आता ग्लॅमर इंडस्ट्रीत हा शब्द अगदी सहज वापरला जातो. विजयने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात म्हटलं होतं, ''रश्मिका नेहमीच सुंदर दिसते''. यावरनं देखील दोघांनी बातम्यांच्या हेडलाईनमध्ये जागा मिळवली होती. आणि दूरदूरपर्यंत दोघांमध्ये काहीतरी शिजतंय ही अफवा सगळीकडे पसरली होती. पण पुन्हा स्पष्ट करतो, रश्मिका-विजय यांच्यात दोन वर्षापूर्वी ब्रेकअप झालं आहे. आणि ही बातमी जवळच्या सूत्रांकडूनच समोर आलेली आहे.
रश्मिकाच्या रक्षितशी असलेल्या नात्याविषयी बोलायचं तर ते दोघं 'किरिक पार्टी' या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी एकमेकांमध्ये गुंतले आणि २०१७ मध्ये त्यांनी साखरपुडा केला. पण त्यानंतर रश्मिका आणि रक्षितनं आपल्या नात्याचा द एन्ड करत वेगळ्या वाटा निवडल्या होत्या.
आता विजय-रश्मिका विषयीचा हा नवा गौप्यस्फोट जो झालाय तो ऐकल्यावर मात्र त्यांचे चाहते थोडे खट्टू होतील खरे. पण दोघं पुन्हा एकत्र येण्याचे काही चान्सेस आहेत का? ही वेडी आशा देखील त्यांच्या मनात तयार होईल हे देखील तितकेच खरे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.