Vijay Sethupathi demolishes simplicity tag
Vijay Sethupathi demolishes simplicity tag 
मनोरंजन

Vijay Setupathi Birthday: 'मला साधं समजू नका, वेळ आली तर मी...' विजय सेतुपतीनं स्पष्टपणे सांगितलं

युगंधर ताजणे

Vijay Sethupathi Birthday Special: आज साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीचा वाढदिवस. साऊथमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख तयार करणाऱ्या विजयचा बॉलीवूडमध्ये देखील मोठा चाहतावर्ग आहे. त्याची लोकप्रियता मोठी आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यानं त्याच्या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. आता तो मेरी ख्रिसमसमधून नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतो आहे.

यापूर्वी किंग खान शाहखरुच्या जवानमध्ये विजय सेतूपतिनं नकारात्मक भूमिका साकारली होती. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मेरी ख्रिसमस नावाच्या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. तो चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे. त्या चित्रपटाच्या निमित्तानं एका मुलाखतीमध्ये विजयनं त्याच्या साधेपणाविषयी जे सांगितलं आहे त्यामुळे तो चर्चेत आहे.

विजय हा त्याच्या साध्या राहणीमानाबद्दल ओळखला जातो. सोशल मीडियावर त्याचे जे फोटो आहेत त्यातूनही तो नेहमीच त्याच्या साध्या पेहरावामुळे चाहत्यांच्या कौतुकाचा विषय असल्याचे दिसून येते. एका मुलाखतीमध्ये त्यानं मात्र त्याविषयी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, मला फारसे महागडे कपडे घालण्याची सवय नाही.

अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या विजयचा चाहतावर्ग बॉलीवूडमध्येही आहे. गेल्या वर्षी त्यानं शाहरुखसोबत जवानमध्ये केलेल्या भूमिकेचे कौतुक झाले होते. त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर आठशे कोटींपेक्षा जास्त कमाईही केली होती. बदलापूर, अंधाधून सारखे चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या श्रीराम राघवन यांच्या मेरी ख्रिसमस नावाच्या चित्रपटामध्ये तो आणि कतरिना कैफ दिसणार आहेत.

लोकांना माझ्याविषयी खूपच गैरसमज आहेत. जसे की मी खूपच साधा राहतो, माझा पेहराव खूपच साधा असतो. मी महागडे कपडे परिधान करत नाही. बॉलीवूड हंगामाला दिलेल्या त्या मुलाखतीमध्ये विजय सांगतो की, मला जे कम्फर्ट वाटते ते त्यानुसार मी राहणे पसंत करतो. कपड्यांच्या बाबत मी जरासा गंभीरपणे विचार करतो.

सध्या माझ्या चित्रपटाचे जे प्रमोशन सुरु आहे त्यासाठी मी काही साध्या कपड्यांमध्ये आलेलो नाही. ते खूपच महागडे आहे. चाहत्यांना माझ्याविषयी अनेक चुकीच्या धारणा आहेत त्यात कपड्यांविषयी जरा जास्तच आहेत. अशा शब्दांत विजयनं त्याच्याविषयी सांगितलं आहे. लोकं मला साधं समजतात पण मी तसा नाहीये, मी जेम्स बाँडपेक्षाही भारी दिसेल. पण मला जे कम्फर्ट वाटते त्या नुसार मी राहतो. असे विजयचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT