Vikram Gokhale health Updates esakal
मनोरंजन

Vikram Gokhale : 'उपचारांना प्रतिसाद नाही'! डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न, पत्नी वृषाली यांची माहिती

मराठी - हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते विक्रम गोखले हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Vikram Gokhale Marathi Actor: मराठी - हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते विक्रम गोखले हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल आहेत. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु आहेत. अशातच गोखले यांच्या प्रकृतीबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

यासगळ्या प्रकारावर गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी मीडियासाठी निवेदन दिले आहे. ते आता व्हायरल झाले आहे. यापूर्वी गोखले यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या कुटूंबातील सदस्य राजेश दामले यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. त्यात त्यांनी अद्याप गोखले हे व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती दिली होती.

हेही वाचा -मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

आता गोखले यांनी आपल्या त्या निवेदनाममध्ये गेल्या २४ तासांपासून गोखले यांची प्रकृती अधिक खालावली असल्याचे म्हटले आहे. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळत नाही. मात्र डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तरीही त्यांच्या प्रकृतीबाबत ज्या वेगवेगळया प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर विश्वास ठेवू नये असे त्यांनी म्हटले आहे.

गोखले हे ८२ वर्षांचे असून ते गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. गोखले हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गोदावरी या मराठी चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबाबतची बातमी वाचून चाहत्यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT