Vivek Agnihotri gets brutually trolled as he goes for morning walk y category security cover Google
मनोरंजन

Vivek Agnihotri: सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात मॉर्निंग वॉकला निघालेले अग्निहोत्री ट्रोल, लोक म्हणू लागले...

अग्निहोत्रींनी ट्वीटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे जो जोरदार व्हायरल झाला आहे,आणि लोक थेट दिग्दर्शकावर आरोप करू लागलेयत.

प्रणाली मोरे

Vivek Agnihotri: 'द काश्मिर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अग्निहोत्री मॉर्निंग वॉकला निघालेले दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षकांचा मोठा ताफा आहे.

त्या व्हिडीओत त्यांनी म्हटलं आहे की, काश्मिरी पंडितांची हत्या आणि पलायनवाद यावर आधारित सिनेमा बनवण्याची किंमत त्यांना मोजावी लागली आहे. मात्र सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्रींच्या या व्हिडीओला ट्रोल केलं जात आहे.(Vivek Agnihotri gets brutually trolled as he goes for morning walk y category security cover)

व्हिडीओला ट्वीटरवर शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं आहे की,''काश्मिरमध्ये घडलेला हिंदूंचा नरसंहार लोकांसमोर आणण्याची किंमत मी आता मोजतोय. ज्या देशात हिंदू मोठ्या संख्येने राहतात ,तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण उपभोगतोय का?''. विवेक या व्हिडीओत काळ्या रंगाच्या ट्रॅक सूटमध्ये दिसत आहेत. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षकांचा ग्रुप दिसत आहे.

या व्हिडीओला ट्वीटरवर जोरदार ट्रोल केले जात आहे. अग्निहोत्रींच्या एका फॉलोअरनं लिहिलं आहे की,'ओह..माय टॅक्स मनी..' आणि आणखी एकानं लिहिलं आहे की, 'कर वेळेत भरणाऱ्यांच्या पैशाची अशी बर्बादी सुरु आहे तर...' ,कुणीतरी तर थेट म्हटलंय की,'आमच्या टॅक्सच्या पैशानी सुरक्षा उपभोगतायत'. तर एकानं अग्निहोत्री आपल्या व्हाय प्लस सुरक्षेचा दिखावा करत आहेत असा दावा केलाय.

हेही वाचा: Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

२०२२ मार्चमध्ये विवेक अग्निहोत्रींचा सिनेमा 'द काश्मिर फाईल्स' रिलीज झाल्यानंतर त्यांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती,ज्यात चार ते पाच कमांडोंचा समावेश आहे. 'द काश्मिर फाईल्स'ने जगभरात ३४० करोडचं कलेक्शन केलं होतं. या वर्षातील सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या बॉलीवूडच्या सिनेमांपैकी हा एक सिनेमा आहे. मिथुन चक्रवर्ती,अनुपम खेर,दर्शन कुमार,पल्लवी जोशी,चिन्मय मांडलेकर,भाषा सुम्बली असे कलाकार या सिनेमात होते.

माहितीसाठी थोडं इथे नमूद करतो की, अग्निहोत्रींनी आपल्या आगामी 'वॅक्सीन वॉर' सिनेमाचं शूटिंग सुरू केलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी शूटिंगची घोषणा करताना स्क्रीनप्ले आणि क्लॅप बोर्डचा एक फोटो शेअर केला होता. हा सिनेमा पुढील वर्षी स्वातंत्र्य दिनी ११ भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagar Panchayat-Nagar Parishad elections जाहीर… परंतु इच्छुकांना इशारा! ‘हे’ केल्यास थेट जेलची वारी! काय म्हणतो कायदा?

Bishnoi Gang: धक्कादायक! हल्लेखोर आले अन् धाड... धाड... धाड... प्रसिद्ध कबड्डीपटूला बिश्नोई टोळीनं संपवलं, प्रकरण काय?

NZ vs WI : न्यूझीलंडच्या ३७ धावांत ६ विकेट्स; वेस्ट इंडिजने सॉलिड मॅच फिरवली, ७ धावांनी बाजी मारली

फॅमिली मॅन म्हणवणाऱ्या अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींशी शारीरिक संबंध; डिटेक्टीव्हची पोलखोल; पत्नीलाही सगळं माहितीये पण...

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरात शिंदे सेनेच्या मेळाव्यापूर्वी कर्मचाऱ्याला विजेचा धक्का

SCROLL FOR NEXT