VIvek Agnihotri takes a dig on Ayan Mukerji And Karan Johar Google
मनोरंजन

'ब्रह्मास्त्र'वर अग्निहोत्रींचे टीकास्त्र; करण,अयानची खिल्ली उडवत म्हणाले...

'द काश्मिर फाईल्स' सिनेमामुळे चर्चेत आलेले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे बरेच चर्चेत पहायला मिळतात.

प्रणाली मोरे

Vivek Agnihotri :द काश्मिर फाईल्स(The Kashmir Files) सिनेमामुळे चर्चेत आलेले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे बरेच चर्चेत आहेत. त्यांनी नुकतेच आता ब्रह्मास्त्रच्या टीमवर आपले टीकास्त्र सोडले आहे. अग्निहोत्रींनी अयान मुखर्जी आणि करण जोहर (Karan Johar) यांच्यावर निशाणा साधत हे लोक 'ब्रह्मास्त्र' नीट बोलूही शकत नाही असा हल्लाबोल केला आहे. करण जोहर आपल्या सिनेमात LGBTQ कम्युनिटीतील लोकांची कसा खिल्ली उडवतो याविषयी देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे. चला सविस्तर जाणून घेऊया नेमकं काय म्हणालेत विवेक अग्निहोत्री.(VIvek Agnihotri takes a dig on Ayan Mukerji And Karan Johar)

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्रींनी अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' सिनेमातील स्टारकास्ट आलिया भट्ट आणि रणबीर कपूर विषयी बातचीत केली आहे. ते म्हणाले की, या 'बह्मास्त्र'च्या मेकर्सना 'ब्रह्मास्त्र'चा नीट अर्थ देखील माहित नसेल. ते 'अस्त्र वर्स' संदर्भात बोलत आहेत जिथे जातील तिथे. अग्निहोत्री यांच्या म्हणण्यानुसार अयानला 'ब्रह्मास्त्र'चा नीट उच्चारही करता येत नाही.

अर्थात,विवेक अग्निहोत्री यांनी अयान मुखर्जीची प्रशंसा देखील केली आहे. ते पुढे म्हणाले आहेत की,''अयान एक उत्तम दिग्दर्शक आहेत. त्यानं 'वेक अप सिद' आणि 'ये जवानी है दिवानी' सारखे सिनेमे बनवले आहेत. विवेक अग्निहोत्री म्हणाले की,'जसं ते आपल्या मुलांच्या भविष्यासाठी चिंतेत असतात तशीच त्यांना आता अयान मुखर्जीविषयी देखील काळजी वाटत आहे'.

त्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी करण जोहरवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की करण जोहर नेहमीच आपल्या सिनेमातून LGBTQ समाजाविषयी बोलताना त्यांची खिल्ली उडवताना दिसतो.

'ब्रह्मास्त्र' सिनेमा तीन पार्टमध्ये बनला आहे,ज्याचा पहिला भाग ९ सप्टेंबर,२०२२ रोजी रिलीज होत आहे. यात रणबीर कपूर,आलिया भट्ट,नागार्जुन,अमिताभ बच्चन,मौनी रॉय हे स्टार कलाकार दिसणार आहेत. बोललं जात आहे की शाहरुख खान,रणवीर सिंग,दीपिका पदूकोण या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत. आणि बरेच सरप्राईजेस या सिनेमात पहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे. सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी असून,निर्माता करण जोहर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT