yeh kaali kaali aankhen actress aanchal singh reveal she has no work Instagram
मनोरंजन

Aanchal Singh: 'मी खचलेय..गेल्या सहा महिन्यापासून मला..', अभिनेत्री आंचल सिंगच्या पोस्टनं खळबळ

प्रसिद्ध वेबसिरीज 'ये काली काली आंखे'फेम अभिनेत्री आंचल सिंगनं इंडस्ट्री विषयी आणि स्वतःच्या आयुष्याविषयी केलेल्या खुलास्यांनी सगळ्यांनाच धक्का बसलाय.

प्रणाली मोरे

Aanchal Singh: आंचल सिंग हिनं कितीतरी जाहिराती,सिनेमे आणि वेब सीरिज मधून काम केलं आहे. सध्या ती आपल्या खळबळजनक पोस्टमुळे चर्चेत आली आहे. आंचलने काम न करण्याविषयी आणि इंडस्ट्रीविषयी अशा काही गोष्टी बोलून दाखवल्या आहेत ज्याची भरपूर चर्चा रंगली आहे. आंचलला गेल्या काही दिवसांपासून तिचे चाहते सोशल मीडियावर विचारत होते की ती सध्या कुठल्याच प्रोजेक्टमध्ये का दिसत नाही. तसंच तिच्या कुठल्याही भूमिकेला पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकन का मिळालं नाही?.

त्यानंतर अभिनेत्रीनं सोशल मीडियावर याविषयी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. तिनं लिहिलं आहे की, ''रोज मला लोक विचारतात की आता तू काय करणार आहे, तुला तुझ्या कुठल्याच भूमिकेसाठी नामांकन का मिळत नाही?. तर ज्या लोकांना यामागचं कारण जाणून घेण्यात इंट्रेस्ट आहे त्यांच्यासाठी हे सत्य मी सांगतेय''. आणि त्यानंतर आचलनं काही मुद्दे समोर आणले.(yeh kaali kaali aankhen actress aanchal singh reveal she has no work)

१. ६ महिन्यापासून मला कुठल्याच सिनेमा किंवा सीरिजसाठी साधा ऑडिशनचा देखील कॉल आलेला नाही. केवळ २ ठिकाणी मला बोलावलं होतं. जेव्हा मी कॉल करून विचारते,कामाची चौकशी करते तेव्हा मला सांगण्यात येतं सध्या काही काम नाही. आणि नामांकन मिळण्याविषयी बोलायचं तर ती गोष्ट माझ्या हातात नाही.

२. मी इंडस्ट्रीला १२ वर्ष दिली आणि मेहनतीनं मी ४०० जाहिराती तसंच पंजाबी,तामिळ आणि श्रीलंकन सिनेमांत काम केलं. मी काही सिनेमे साइन केले होते पण काही कारणानं ते सोडले. 'अनदेखी' वेब सीरिज मध्ये मी काम केलं आहे खरंतर, पण मला खरी ओळख मिळाली ते 'ये काली काली आंखे' वेब सीरिजमुळे. हा एक असा प्रोजेक्ट होता ज्याची मी कायम आभारी राहीन.

३. शेवटचं सर्वात कटू सत्य म्हणजे एवढं चांगलं काम करूनही मी घरी बसलेय. माझ्याकडे काम नाही आणि यामुळे माझं मानसिक खच्चीकरण होतंय. आता वर्ष संपत आलंय...आणि मी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी निघून आले आहे.

माझा विश्वास कायम आहे तो म्हणजे संयमावर. माझं अभिनयावर प्रेम आहे आणि त्याची प्रोसेस मला माहित आहे. पण आजही या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडल्यानंतर मला तब्बू आणि विद्या बालन यांच्यासारखी अभिनेत्री बनायचं आहे. आता कदाचित लोकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. ज्यांनी माझ्याविषयी काळजी व्यक्त करून काही प्रश्न विचारले त्यांना माझं खूप खूप प्रेम.

आंचल विषयी एक गोष्ट सांगतो की गेल्या काही दिवसांपासून तिच्या कामाला चांगली पसंती मिळताना दिसत आहे आणि सर्वच अशी आशा व्यक्त करतायत की पुढे देखील असंच चांगलं काम ती करेल. पण त्या दरम्यान अभिनेत्रीची निराशाजक पोस्ट समोर आल्यानंतर आता तिचे चाहते तिला धीर देताना दिसत आहेत.

हेही वाचा: Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

अभिनेत्रीला पाठिंबा देत तिचे चाहते तिला कमेंट करत म्हणताना दिसत आहेत की, 'आपल्या आयुष्यात जे घडतंय ते सगळं सत्य लोकांना सांगणं यासाठी खूप हिम्मत लागले. तू खूप मोठी गोष्ट केली आहेस. आम्ही आशा करतो तुला खूप चांगले प्रोजेक्टस मिळतील'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest: सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळ ढवळून निघाला; भारताने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला, सांगितलं...

महाराष्ट्राच्या Shivam Lohakare ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम; पण, होणार नाही अधिकृत नोंद, कारण...

Pune News : विसर्जन मिरवणुकीत हायटेक पोलिसिंग; चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा अचूक वापर; सराईत गुन्हेगारांवर चाप

Shivaji Maharaj: इतिहासातील गुपित! छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान कुठं पळाला? पुढं कधीच परतला नाही

Thane Crime: सोनसाखळी चोरणारी आंतरराज्य टोळी गजाआड, तीन सराईत गुंडांना अटक

SCROLL FOR NEXT