West bengal model saraswati das hanging body found at kasba  Google
मनोरंजन

डिप्रेशननी घेतला मॉडेलचा जीव, बंगाली इंडस्ट्रीत १५ दिवसांतील चौथी Suicide

मॉडेल सरस्वती दासचा मृतदेह तिच्या राहत्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे.

प्रणाली मोरे

बंगाली सिनेइंडस्ट्रीत एकानंतर एक अभिनेत्रींचे मृत्यू होताना दिसत आहेत. गेल्या १५ दिवसांत ३ अभिनेत्रींच्या मृत्यूनंतर आता एका मॉडेलच्या मृत्यूची बातमी समोर येत आहे. बातमी आहे की १८ वर्षीय एका स्ट्रगल करत असलेल्या सरस्वती दास(Saraswati Das) नामक मॉडेलने(Model) आत्महत्या(Suicide) केली आहे. त्यामुळे आता बंगाली इंडस्ट्रीत हे काय सुरु आहे,यावरनं अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत. (West bengal model saraswati das hanging body found at kasba)

सरस्वती दासचा मृतदेह तिच्या राहत्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहेत. सरस्वती दास कोलकातामधील कस्बा विभागात राहत होती. रविवारी २९ मे,२०२२ रोजी तिचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला. सरस्वती दास प्रमाणेच बिदिशा मजूमदार,पल्लवी डे आणि मंजूषा नियोगी यांचे मृतदेह देखील त्यांच्या राहत्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. तिघींच्या आत्महत्या प्रकरणात सुरुवातीला केलेल्या चौकशी अंतर्गत डिप्रेशन आणि प्रेमात मिळालेला धोका यासंबंधीत काही गोष्टी समोर आल्या आहेत.

एका इंग्रजी वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार सरस्वतीच्या मृतदेहाला सर्वप्रथम तिच्या आजीनं पाहिलं आणि तिला पंख्याला लटकलेल्या अवस्थेतून खाली काढलं. त्यानंतर सरस्वतीला CNMC हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. पण तिथे पोहोचण्यापूर्वीच सरस्वतीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

पोलिसांच्या मते,सरस्वती दास आपल्या आजीसोबत झोपलेली होती आणि घरातील इतर सर्व बाहेर गेले होते. सकाळी २ वाजता जेव्हा आजी उठली तेव्हा तिला सरस्वती दिसली नाही. ती सरस्वतीच्या खोलीत गेली तेव्हा तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

मृत सरस्वतीच्या कुटुंबियांकडून आता कळत आहे की,वडिलांनी आईला सोडल्यानंतर ती आपल्या आईसोबतच राहत होती. १० वी नंतर तिनं शिक्षण सोडलं होतं. कुटुंबाच्या पालनपोषणासाठी तिनं लहान मुलांचे ट्युशन घ्यायला सुरुवात केली होती आणि ती मॉडेलिंग देखील करायची. पण गेले काही दिवस सरस्वती आपल्या रिलेशनशीपमुळे डिप्रेशन मध्ये गेली होती. सरस्वतीच्या मृत्यूचं कारण डिप्रेशन आणि ताण-तणाव आहेत की आणखी काही यासंदर्भात पोलिस तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize 2026: फ्रान्सिस हॅल्झेन यांना भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर; अशक्य वाटणाऱ्या कल्पनेला वास्तवात आणलं...

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! मेट्रो डब्यांची संख्या वाढणार, घाटकोपर-वर्सोवादरम्यान सहा डब्यांची ट्रेन धावणार

Japanese Hair Care: जपानी महिलांच्या सिल्की-शायनी केसांचे रहस्य काय? १ रुपयाही खर्च न करता ट्राय करा 'या' ६ सोप्या ट्रिक्स...

Cabinet Meeting: विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय

Property Rights: सासू-सासऱ्यांच्या संपत्तीत सुनेला हिस्सा मिळतो का? घर, जमीन, दागिन्यांमध्ये कायदा काय सांगतो?

SCROLL FOR NEXT