When Priyanka Chopra REVEALED she believed in ‘nazar’  Google
मनोरंजन

'नजर' लागू नये म्हणून प्रियंका चोप्रा करते 'ही' गोष्ट, स्वतः केला खुलासा

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' च्या पाचव्या सिझनमध्ये प्रियंकानं नजर लागण्याविषयी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं होतं.

प्रणाली मोरे

करण जोहरने(Karan Johar) आपला प्रसिद्ध टॉक शो 'कॉफी विथ करण'(Koffee with karan) च्या सातव्या(7th) सिझनची घोषणा केली आहे. या शो मध्ये प्रेक्षकांचे आवडते स्टार्स येतात, मजा-मस्ती करत मजेदार प्रश्नांची उत्तरं देतात. काही कलाकार या शो मध्ये पहिल्यांदाच हजेरी लावणार आहेत तर काही पुन्हा एकदा शो मध्ये हजेरी लावून करणच्या शो ची शोभा वाढवणार आहेत. यातील एक आहे प्रियंका चोप्रा(Priyanka Chopra),जिनं 'कॉफी विथ करण'च्या प्रत्येक सिझनमध्ये हजेरी लावून शो ला चारचॉंद लावले आहेत.(When Priyanka Chopra REVEALED she believed in ‘nazar’ In karan Johar Koffee with karan Show)

'कॉफी विथ करणच्या- 5' व्या सिझनमध्ये प्रियंका चोप्राने शेअर केलं होतं की ती तिच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करायला फार उत्साही नसते. कारण तिचं म्हणणं आहे की चांगल्या गोष्टी घडत असतील तर त्यावर वाईट नजर लवकर पडते. पण करण त्यावेळी तिला म्हणाला होता की,आता या गोष्टी फारश्या महत्त्वाच्या मानल्या जात नाहीत,मात्र प्रियंकानं आपला या सगळ्यावर विश्वास आहे असं ठणकावून त्याला सांगितलं होतं. मात्र त्यावेळी प्रियंका वैयक्तिक आयुष्यावर आधी बोलायची त्याची आठवणही करणनं करुन दिली.

त्यावर प्रियंका म्हणाली,'मी तर कधीच माझ्या वैयक्तिक आयुष्यावर बोलले नाही. वैयक्तिक आयुष्यावर बोलणं मला फारसं महत्त्वाचं, त्याहीपेक्षा योग्य वाटत नाही. तुम्हाला काय माहित की कोणतं नातं कुठवर चालणार आहे,जोपर्यंत ती अंगठी ऑफिशियली तुमच्या बोटात घातली जात नाही. आणि माझा खरं तर वाईट नजर या गोष्टीवर विश्वास आहे. मी पक्की पंजाबी आहे. आपल्याला दृष्ट लागते यावर माझा ठाम विश्वास आहे. जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात,तेव्हा नजरही लागते. तेव्हा त्या वाईट नजरांपासून आपल्या चांगल्या गोष्टींना सुरक्षित ठेवलं पाहिजे''.

'कॉफी विथ करणचा-7' वा सिझन 7 जुलै,2022 पासून सुरू होत आहे. यावेळी हा शो फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केला जाणार आहे. वरुण धवन,अनन्या पांडे,विजय देवरकोंडा,कियारा अडवाणी,अनिल कपूर,नीतू सिंग,सिद्धार्थ मल्होत्रा,रश्मिका मंदाना,कतरिना कैफ,सिद्धांत चतुर्वेदी,अक्षय कुमार,समंथा रुथ प्रभु, जान्हवी कपूर,सारा अली खान,कृती सेनन, रणवीर सिंग आणि आलिया भट्ट असे मोठे सेलिब्रिटी या सिझनध्ये उपस्थित राहण्याची शक्यता आहे. करण जोहरने काही दिवसांपूर्वीच खुलासा केला होता की रणबीर कपूरने करणच्या या नव्या सिझनमध्ये उपस्थित राहण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT