Arjit Singh, Arjit Singh news, Arjit Singh songs, Arjit Singh birthday, salman khan, arjit - salman controversy SAKAL
मनोरंजन

Arjit Singh Birthday: जेव्हा अरिजीतने भर पुरस्कार सोहळ्यात सलमान खानचा केला पाणउतारा तेव्हा...

एका अवॉर्ड सोहळ्यात थेट सुपरस्टार सलमान खानशी पंगा घेतला होता

Devendra Jadhav

Arjit Singh Insults Salman Khan News: तुम ही हो, फिर ले आया दिल ते आता ब्रम्हास्त्र मधील केसरीया गाण्याने तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेला गायक म्हणजे अरिजीत सिंग.

अरिजीतची गाणी ऐकली की मुड एकदम छान होऊन जातो. अरिजीतची अनेक ठिकाणी लाईव्ह कॉन्सर्ट करत असतो. अरिजित तसा इतक्या वादात कधी सापडला नाही.

पण अरिजितने एका अवॉर्ड सोहळ्यात थेट सुपरस्टार सलमान खानशी पंगा घेतला होता. आज अरिजितच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊया तो किस्सा..

(When singer Arijit singh insults Salman Khan at the Awards ceremony controversy)

अवॉर्ड फंक्शन मध्ये अरिजितने घेतला सलमानशी घेतला पंगा:

ही गोष्ट २०१४ ची.. तेही एका अवॉर्ड फंक्शनमध्ये. हा अवॉर्ड फंक्शन सलमान खान आणि रितेश देशमुख होस्ट करत होते. या शोमध्ये अरिजित सिंगला आशिकी २ मधील तुम ही हो गाण्यासाठी एक पुरस्कार देण्यात आला.. ज्यासाठी अरिजित पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर पोहोचला.

अरिजित पुरस्कार घेण्यासाठी काहीसा उशिरा स्टेजवर पोहोचला. त्यावेळी सलमान त्याला म्हणाला.."झोपलेलास का भाऊ?"

अरिजित स्टेजवर आल्यावर त्याने सलमानला सांगितले की,"तुम्हा लोकांमुळे झोप आली." असं म्हणत अरिजितने सर्वांसमोर सलमान - रितेशच्या होस्टिंगवर प्रश्न उपस्थित केले. मात्र, यावर सलमानने लगेचच मजेशीर स्वरात उत्तर दिले.

अशी गाणी गायलात तर नक्कीच झोप येईल, असे ते म्हणाले होते. आणि सलमानने सर्वांसमोर अरिजितच्या तुम ही हो गाण्याचे विडंबन केलं. पुढे मात्र दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि अरिजित पुन्हा स्थानापन्न झाला.

सलमानने अरिजितला त्याचवेळी उत्तर दिले असले तरी, तरीही भाईजानच्या मनात अरिजितबद्दल अढी राहिली.

सलमानचा अरिजितने सर्वांसमोर केलेला पाणउतारा भाईजानला दुखावून गेला, यानंतर मीडियामध्ये बातमी आली की, अरिजितचे गाणे सुलतान चित्रपटातून काढून टाकण्यात आले असून ते गाणे दुसऱ्या गायकाकडे गेले आहे.

पुढे मात्र अरिजित सिंगने झालेल्या प्रकाराबद्दल सलमानची अनेकदा जाहीर माफी मागितली. पण आता दोघांमधले मतभेद संपले असून सलमान - अरिजित पुन्हा एकत्र काम करत आहेत असं सांगण्यात येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT