Vidyut Jamwal-Nandita Mahatani Wedding esakal
मनोरंजन

Nadita Mahatani : विद्युत जामवालसोबत लग्न करणारी 'नंदिता महतानी' आहे तरी कोण? तिचं 'विराट' कनेक्शन काय आहे माहितीये?

बॉलीवूडच्या विद्युत जामवालचे नाव हे हॉलीवूडच्या अॅक्शन सुपरस्टार यांच्यासोबत घेतले जाते.

युगंधर ताजणे

Vidyut Jamwal-Nandita Mahatani Wedding : बॉलीवूडच्या विद्युत जामवालचे नाव हे हॉलीवूडच्या अॅक्शन सुपरस्टार यांच्यासोबत घेतले जाते. सध्याच्या घडीला सर्वोत्तम अॅक्शनस्टार म्हणून त्याचे नाव सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. त्याची लोकप्रियताही मोठी आहे. गेल्या दशकभरापासून विद्युतनं स्वताच्या नावाची वेगळी ओळख प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

विद्युत आता नंदिता महतानीसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. जेव्हा त्याच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावरुन व्हायरल झाली तेव्हापासून त्याच्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या सगळ्यात त्याची होणारी पत्नी नंदिता महतानी आहे तरी कोण याचाही चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी गुगलवर शोध घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी या दोघांचा साखरपुडा झाल्याची माहिती ऑफिशियली त्यांच्या सोशल मीडियावरुन चाहत्यांना सांगितली होती.

Also Read - Penny Stocks : जादा नफ्याच्या मृगजळामागं धावणं नकोच!

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्युत आणि नंदिता हे दोघेजण लंडनमध्ये लग्न करणार आहेत. नंदिताविषयी सांगायचे झाल्यास ती व्यवसायानं फॅशन डिझायनर आहे. ती अभिनेता डिनो मॉरियासोबत प्ले ग्राऊंड नावाची कंपनीही चालवते. याशिवाय बऱ्याच वर्षांपासून भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीची डिझायनर आणि स्टायलिट म्हणूनही ओळखली गेल्याचे सांगण्यात येते.

एवढेच नाहीतर नंदिता आणि करिश्मा कपूरचा एक्स हजबंड संजय कपूरसोबतही तिचे खास कनेक्शन असल्याचे बोलले जाते. नंदिता ही संजय कपूरची पहिली पत्नी आहे. त्यांचे नाते हे फार काळ टिकले नाही. त्यांनी संमतीनं घटस्फोट घेतला. त्यानंतर संजयनं करिश्मासोबत लग्न केले. त्यांचाही २०१६ मध्ये घटस्फोट झाला. नंदिताचे नाव अनेक बॉलीवूडच्या अभिनेत्यांसोबत जोडले गेले. त्यात रणबीर कपूर, डिनो मोरिया यांची नावं आहेत.

नंदिता आणि विद्युतच्या नावाची चर्चा ही जानेवारी २०२१ पासून सुरु झाली. त्यांनी एक फोटोही सोशल मीडियावर शेयर केला होता. त्यात म्हटलं होतं की, मी जिंकून घेतलं. त्यानंतर विद्युत आणि नंदिताच्या नावाची जोरदार चर्चा होऊ लागली. त्यांचा साखरपुडाही झाला होता. त्याविषयी कुणाला माहितीही नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT