Amar Singh Chamkila Movie Esakal
मनोरंजन

Amar Singh Chamkila कोण होते?..ज्यांची भूमिका साकारतोय दिलजीत दोसांझ.. अंगाचा थरकाप उडवणार त्यांच्या हत्येची कहाणी

दिग्दर्शक इम्तियाज अली दिग्दर्शित अमर सिंह चमकिला या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला अन् सिनेमाची उत्सुकता अधिक वाढली.

प्रणाली मोरे

Amar Singh Chamkila Movie: दिग्दर्शक इम्तियाज अलीनं आपला नवा सिनेमा 'अमर सिंह चमकिला' चा टीझर रीलिज केला आहे,ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे, काही वर्ष आधी इम्तियाज अलीनं आपल्या सिनेमाची घोषण केली होती,जो पंजाबचे प्रसिद्ध गायक अमर सिंह चमकिला यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

अमर सिंह चमकिला पूर्ण पंजाबवर राज्य करायचे आणि त्यांच्या कार्यक्रमांना तगडं बुकिंग असायचं. देशातील कानाकोपऱ्यात अमर सिंह चमकिलांचे शो व्हायचे. पण वयाच्या २७ व्या वर्षी चमकिला यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या पत्नीची देखील त्यावेळी निर्घृण हत्या केली होती.

चला जाणून घेऊया अमर सिंह चमकिला यांच्याविषयी..(Who was amar singh chamkila diljit dosanjh play a role in amar singh chamkila movie)

अमर सिंह चमकिला या सिनेमात पंजाबी गायकाच्या भूमिकेत दिलजित दोसांझ आहे. सिनेमात दिलजीतसोबत परिणीती चोप्रा देखील दिसणार आहे. या सिनेमाला लवकरच नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केलं जाणार आहे.

इम्तियाज अलीच्या या सिनेमात अमर सिंह चमकिला यांच्या आयुष्यातील माहित नसलेल्या अनेक गोष्टी कथेच्या माध्यमातून दिसतील. अमर सिंह चमकिला केवळ एक गायक नव्हते तर संगीतकार,गीतकार देखील होते. पंजाबमध्ये त्यांचं मोठं नाव होतं.

चमकिला यांना पंजाबचा बेस्ट लाइव्ह स्टेज परफॉर्मर मानलं जातं. बोललं जातं की चमकिला यांच्यासारखा परफॉर्मर पंजाबमध्ये आजपर्यंत जन्माला आलेला नाही.

अमर सिंह चमकिला यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. त्यांनी ढोलकी आणि हार्मोनियम शिकलं आणि संगीताच्या विश्वात पाऊल ठेवलं.

बोललं जातं की त्यांनी एका कपड्याच्या मिलमध्ये देखील काम केलं होतं. याचं कारण होतं कुटुंबाची आर्थिक स्थिती.

आता उत्सुकता आहे ते हे सगळं मोठ्या पडद्यावर दाखवताना इम्तियाजनं आपला स्पेशल टच कसा दिलाय हे जाणून घेण्याची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6 Live Update: आली रे आली राधा मुंबईकर आली! सबसे पाटील राधा पाटीलची 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

SCROLL FOR NEXT