Alia Bhatt Google
मनोरंजन

आलिया भट्टचं काय बिनसलं? म्हणे करिअरचा दुसरा ऑप्शन शोधलाय

एका मुलाखती दरम्यान तिनं आपल्या त्या करिअर ऑप्शनविषयी खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

आलिया भट्टचं(Alia Bhatt) करिअर सध्या सुसाट पळतंय. म्हणजे बॉलीवूड(Bollywood)मध्ये या सुसाट पळण्यावर किती भरोसा करायचा यावर थोडं प्रश्नचिन्हच आहे. कारण इथे एका रात्रीत अनेकांना स्टार होताना आपण पाहतो,तर केव्हा केव्हा तर तोच स्टार रस्त्यावर आलेला देखील पाहतो. अशी अनेक उदाहरणं डोळ्यासमोर झरझर येतील आपल्या. पण याचाच धसका आलियानं घेतला आहे की काय कोण जाणे. मुलाखतीतनं ती सांगत सुटलीय आपल्या त्या दुसऱ्या करिअर ऑप्शनविषयी.

आलियाचा नुकताच 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा प्रदर्शित झाला. प्रदर्शनाआधीच नुसते प्रोमो पाहून आलियाचं जो-तो कौतूक करत सुटला होता. प्रदर्शनानंतरही अनेकांनी तिच्या भूमिकेला डोक्यावर उचललं. तसं पाहिलं तर 'स्टुडंट ऑफ द इयर' पासून सुरू झालेला तिचा अभिनय क्षेत्रातला प्रवास हा चढता ग्राफच ठरला आहे. 'हायवे','राझी','डिअर जिंदगी','उडता पंजाब','गल्ली बॉय' अशा अनेक सिनेमांनी ती एक उत्तम अभिनेत्री आहे हे सिद्ध केलंय. पण असं असतानाही आलिया देखील आपल्या अभिनय कारकिर्दीला घेऊन चिंतेत दिसली.

ती म्हणाली,''मी माझं दुसरं करिअर ऑप्शन तयार ठेवलं आहे. मी जर अभिनेत्री म्हणून यशस्वी झाले नाही तर मी आधीच ठरवलं होतं मी 'मास्टर ऑफ ऑर्गनायझेशन' मध्ये करिअर करीन. कारण मला ते उत्तम जमतं. आवडतं. आजही जर मी अभिनयक्षेत्रात मागे पडले तर या दुसऱ्या करिअरचा नक्कीच विचार करेन'',असं देखील तिनं तिच्या मुलाखतीत नमूद केलं. आलियानं म्हणे तिची पहिली फिल्म 'स्टुडंट ऑफ द इयर' साठी तब्बल १६ किलो वजन कमी केलं होतं. आणि तब्बल ४०० मुलीमधून तिची त्या सिनेमातील शनायाच्या भूमिकेसाठी निवड झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑगस्ट 2026

ढिंग टांग : झुरळांचा झपुर्झा..!

SCROLL FOR NEXT