Shilpa Shetty Speaks about raj Kundra Google
मनोरंजन

'राज कुंद्रा चेहरा झाकून का फिरतो?' शिल्पा शेट्टी काय म्हणाली पहा...

'निकम्मा' या शिल्पा शेट्टीच्या आगामी सिनेमाच्या ट्रेलर रिलीज निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत तिनं अनेक विषयांवर बातचीत केली आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं(Shilpa Shetty) काही दिवसांपूर्वीच अगदी रीतसर जाहिर केलं होतं की ती यापुढे सोशल मीडियापासून ब्रेक घेणार आहे. तशी पोस्टच तिनं केली होती. पण आता समोर आलंय की तिनं हे केवळ तिचा आगामी सिनेमा निकम्माच्या(Nikamma) प्रमोशनसाठी केलं आहे. 'निक्कमा' सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला. या कार्यक्रमात शिल्पा शेट्टीसोबत सिनेमातील इतर मुख्य कलाकार शर्ली सेतिया,अभिमन्यु दासानी आणि दिग्दर्शक साबिर खान उपस्थित होते. मुलाला पाठिंबा देण्यासाठी यावेळी अभिनेत्री भाग्यश्री देखील उपस्थित होती. अभिमन्यु दासानी हा भाग्यश्रीचा मुलगा आहे.

ट्रेलर लॉंचनंतर मीडियासोबतच्या प्रश्न-उत्तराच्या कार्यक्रमात शिल्पा शेट्टीला तिचा नवरा राज कुंद्रा(Raj Kundra) संबंधित प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न विचारल्यावर सुरुवातीला तर शिल्पा शांत बसली. आणि नंतर म्हणाली,''हरकत नाही मी या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देईन''.

शिल्पा शेट्टीला राज कुंद्राला झालेली अटक यामुळं खूप त्रास सहन करावा लागला. पण त्यातून बाहेर येत तिनं टी.व्ही शोज आणि सिनेमातनं पुन्हा काम करायला सुरुवात केली. पण राज कुंद्रा मात्र त्या प्रकरणानंतर अजुनही सार्वजनिक ठिकाणी लोकांचा सामना करीत नाहीत,असं का? आणि तो कठीण काळ तुझ्यासाठी कसा होता,तू कसं त्यातून बाहेर आलीस असं अगदी सारवा-सारव करीत पत्रकारांनी शिल्पाला प्रश्न केला. खरंतर राज कुंद्रा सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकून का फिरतो असंच पत्रकारांना शिल्पाला विचारायचं होतं. मग काय त्यांनी जसं फिरवून-फिरवून प्रश्न विचारला त्याचा स्टाईलमध्ये शिल्पानं गोल-गोल फिरवत पत्रकारांना उत्तर दिलं. काय म्हणालीय शिल्पा एकदा वाचाच.

पत्रकारांच्या लांबलचक प्रश्नावर थोडावेळ थांबून शिल्पा म्हणाली,''मी नक्कीच याचं उत्तर देईन. मला वाटतं आज आपण एका नवीन सिनेमाच्या सेलिब्रेशनसाठी भेटलो आहोत. एक नवीन सुरुवात होत आहे म्हणून एकत्र जमलेलो आहोत. आणि इथे मी एकटीच नाही तर माझ्या सिनेमाची संपूर्ण टीम आहे. मला नाही वाटत,अशा वेळेला इथे माझ्या आयुष्याशी संबंधित बोललं गेलं पाहिजे. जर हा प्रश्न सिनेमाशी संबंधित असतात तर मी नक्कीच उत्तर दिलं असतं. माझ्या आयुष्यातील कठीण काळाविषयी बोलायचं झालं तर हो तो काळ माझ्यासाठी खूप मोठं संकट घेऊन आला होता. खासकरुन कोरोनाचा गेल्या २ वर्षांचा काळ. तो फक्त माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी मोठं संकट होतं. सिनेसृ्ष्टीसाठी देखील तो मोठा कठीण काळ होता. तेव्हा थिएटर बंद होते आणि सिनेमे तयार असून देखील आम्ही ते प्रदर्शित करू शकत नव्हतो''.

''माझ्यासाठी हा सिनेमा स्पेशल आहे कारण तब्बल १४ वर्षांनी माझा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यामुळे आज आपण चांगल्या गोष्टींविषयीच बोलूया. जसं तुम्ही मला 'निकम्मा'च्या ट्रेलरमध्ये सुपर वुमन च्या अवतारात पाहिलं आहे,तसंच प्रत्यक्ष आयुष्यातही कठीण प्रसंगाशी झगडत मी स्वतःला खूप स्ट्रॉंग बनवलं आहे. आपल्यापैकी कितीतरी जणं आपल्या कठीण काळात डगमगून जातात,पण असं असलं तरी आपण सगळेच वेगवेगळ्या अडचणींचा सामना केल्यानंतरच अधिक मजबूत बनतो''. आता शिल्पाच्या या उत्तरावरुन अंदाज आलाच असेल आपल्याला की कसं शिल्पानं आपल्या नवऱ्याचा विषय टाळत पत्रकारांच्या प्रश्नापासून स्वतःची कशी सहीसलामत सुटका करून घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

SCROLL FOR NEXT