Why is actor Bobby Deol trending after Bumrah’s injury? watch amazing video
Why is actor Bobby Deol trending after Bumrah’s injury? watch amazing video Google
मनोरंजन

Viral Video: बुमराहला दुखापत झाल्यानंतर सोशल मीडियावर बॉबी देवल का होतोय ट्रेंड?

सकाळ डिजिटल टीम

Bobby Deol trending after Bumrah’s injury?: वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे T20 विश्वचषकातून बाहेर पडावं लागलं आहे. पाठीच्या समस्येमुळे जसप्रीतला जवळपास चार ते सहा महिने आता क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागणार आहे. जसप्रीतच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आल्याची घोषणा बीसीसीआयने शुक्रवारी केली. मात्र त्यापूर्वी सोशल मीडियावर बूमराहच्या जागी कोण येणार यावरून जोरदार चर्चा रंगली होती. (Why is actor Bobby Deol trending after Bumrah’s injury? watch amazing video)

या चर्चेदरम्यान मात्र बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल चांगलाच ट्रेंडमध्ये आला होता. आता भारतीय क्रिकेट संघाचा आणि बॉबी देओलचा काय संबंध? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर त्यासाठी कारणीभूत ठरतोय तो म्हणजे एक व्हायरल व्हिडिओ.

बुमराहच्या दुखापतीच वृत्त समोर येताच दुसरीकडे बॉबी देओलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. हा व्हिडिओ एका क्रिकेट मॅचचा आहे. यात बॉबी गोलंदाजी करताना दिसतोय. व्हिडिओत ज्या प्रकारे बॉबी गोलंदाजी करतोय ते पाहून त्याच्या स्टाईलची तुलना जसप्रीत बुमराहशी केली जातेय.

बॉबी देओलची स्टाईल बुमराह सारखी?

बॉबी देओलचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी लीगमधील आहे. यावेळी चाहत्यांमध्ये बॉबीच्या गोलंदाजीची मोठी चर्चा झाली होती. अनेकांनी त्याला जसप्रीत बुमराह म्हटलं होतं. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी बॉबीचा हा व्हिडिओ शेअर करत बुमराहच्या जागी बॉबीलाच T20 वर्ल्ड कपमध्ये घ्यावं असं म्हणत मजेशीर चर्चा सुरू केली .

दरम्यान, जसप्रित बुमराहच्या जागी आता भारतीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आला आहे, अशी घोषणा BCCI ने केली आहे. बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून सिराजचा संघात समावेश केल्याची माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT