Yogi Adityanath Watches Movie With Akshay Kumar Google
मनोरंजन

योगी आदित्यनाथांनी 'सम्राट पृथ्वीराज' पाहून सोडलं फर्मान,म्हणाले...

'सम्राट पृथ्वीराज' प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी या सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग लखनौ इथं ठेवण्यात आलं होतं.

प्रणाली मोरे

अभिनेता अक्षय कुमारचा(AKshay Kumar) सिनेमा 'सम्राट पृथ्वीराज'(Samrat Prithviraj) आज ३ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. पण काही खास बड्या राजकीय नेत्यांसाठी सिनेमाचं स्क्रिनिंग ठेवणं अक्षय कुमार आणि टीमला फायद्याचं ठरलं आहे. एकतर प्रदर्शनाआधीच अनेक चांगल्या-वाईट कारणांनी सिनेमा चर्चेत होता. अर्थात त्यामुळे चाहतेही सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहत होते. सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर खूप ठिकाणी फिरले. त्याच दरम्यान आता २ जून रोजी सिनेमाच्या टीमनं लखनौला सिनेमाचं स्पशेल स्क्रीनिंग ठेवलं होतं,जिथे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांनी हजेरी लावली होती आणि संपूर्ण सिनेमा पाहिला देखील. इतकंच नाही तर सिनेमा पाहिल्यावर त्यांनी थेट आपल्या अधिकाऱ्यांना सिनेमा टॅक्स फ्री करण्याचे फर्मान सोडले. अधिकृतरित्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारतर्फे घोषणा करण्यात आली आहे की,''आम्ही घोषणा करत आहोत कि 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमाला उत्तर प्रदेशात टॅक्स फ्री केलं जाईल कारण प्रत्येक सर्वसामान्य माणसााला हा सिनेमा पाहता आला पाहिजे''.

योगी आदित्यनाथ यांनी आपले काही अधिकारी आणि सहकाऱ्यांसोबत राजपूत हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित बायोपीकच्या स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी अक्षय कुमार,मानुषी छिल्लर आणि सिनेमाचे दिग्दर्शक चंद्र प्रकाश द्विवेदी देखील उपस्थित होते. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य,परिवहन मंत्री दया शंकर सिंग,जेपीएस राठौड, ए.के.शर्मा, नंद गोपाल गुप्ता नंदी आणि अन्य काही अधिकाऱ्यांनी देखील या स्पेशल स्क्रीनिंगचा आस्वाद घेतला.

या स्क्रीनिंग दरम्यान अक्षय कुमार मंचावर आला आणि म्हणाला,''मी आपल्या सर्वांचा आभारी आहे की आपण सर्वांनी हा सिनेमा पाहिला. आणि खुप योग्य वेळी टाळ्या वाजवल्या. आमचा उत्साह वाढवला,त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जास्त वेळ मी घेणार नाही कारण वेळ खूप किमती आहे''. त्यानंतर अक्षयने यूपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना स्टेजवर येऊन बोलण्याची विनंती केली.

२ जूनला केंद्रिय मंत्री अमित शाह यांनी देखील दिल्लीमध्ये सिनेमा पाहिला होता. सिनेमा पाहिल्यानंतर त्यांनी अक्षय कुमारची खूप प्रशंसा केली. ते म्हणाले होते,''हा सिनेमा महिलांचा सम्मान करणारा आहे आणि महिलांना सक्षम करणाऱ्या भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवतो. एका अशा नायकाची ही कहाणी आहे ज्यानं अफगाणिस्तानपासून दिल्ली पर्यंतच्या सगळ्या लढाया लढल्या आहेत. भारत खूप वर्षांपासून परकीय आक्रमणाचा सामना करत आला आहे''.

या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यानं अक्षय कुमारने एएनआय ला दिलेल्या एका मुलाखतीत केंद्रिय मंत्री धर्मेश प्रधान यांना पृथ्वीराज चौहान आणि महाराणा प्रताप सारख्या भारतीय राजांच्या कथा इतिहासाच्या अभ्यासक्रमात सामिल करण्याची मागणी केली होती. तो म्हणाला होता,''मी असं नाही म्हणत की मुघलांविषयी वाचायला नको,त्याचा अभ्यास केला नाही पाहिजे पण भारतीय राजांचा इतिहास देखील अभ्यासात हवा. ते खरंच खूप महान होते''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : जिल्हा परिषद, पंचायत समितीतही स्वीकृत सदस्य; साहेब, आण्णा, दादा, मामांना मिळणार संधी, अधिनियमात दुरुस्ती होणार

पाच दिवसांपूर्वीच घेतलेली नवीकोरी बस, अग्नितांडवात २० जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Panchang 15 October 2025: आजच्या दिवशी नारायण कवच स्तोत्र पठण व ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Diwali for Diabetics: शुगर नको, पण गोडपणं हवं? मग मधुमेहींनी आर्टिफिशियल स्वीटनरने साजरी करा दिवाळी!

Latest Marathi News Live Update : सावंतवाडीत ८० किलो गोमांस जप्त; दोघांना अटक

SCROLL FOR NEXT