उमरगा : राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या उमरगा शहर व तालुक्यात परदेश व बाहेर जिल्हयाहुन येणाऱ्या लोकांची संख्या आणखी वाढते आहे. शुक्रवारी (ता. २७) मुंबई, पूणे जिल्ह्यातूून शहरात प्रवेश केलेल्या टेम्पोतील चाळीस ते पन्नास लोकांची तपासणी करुन घेण्यास प्रशासनाने भाग पाडले, तपासणीनंतर त्यांना होम क्वाइंटरमध्ये रहाण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाने दिल्या. या प्रकरणी टेम्पोचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान गेल्या चार - पाच दिवसापासून बंद असलेले खाजगी रुग्णालयाने शुक्रवारपासून (ता.२७) रूग्णसेवा सुरू केल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकिय यंत्रणा काम करते आहे. नागरिकांमध्येही जनजागृती निर्माण झालेली असली तरी बऱ्याच जणांना त्याचे गांभीर्य वाटत नाही. कांही तरी बहाना करून फिरस्त्यांची संख्या दिसत आहे. पोलिस यंत्रणेची गस्त सुरू असतानाही पोलिसांना चकवा देऊन कांही जण फिरताहेत. उमरगा व तालुक्यातील नागरिकामध्ये कोरोनाची भिती फारसी नव्हती मात्र परदेश व बाहेर जिल्ह्यातून आलेल्या लोकांची संख्या वाढत असल्याने लोकांमध्ये भिती वाढते आहे.
प्रशासनाकडुन प्रत्येक गावात आलेल्या लोकांची यादी तयार करून त्याची तपासणी केली जातेय. दरम्यान शुक्रवारी सकाळी पूणे, मुंबई येथून बंदीस्त असलेल्या टेम्पोची राष्ट्रीय महामार्गावरील डिग्गीरोड येथे पेट्रोलिंगसाठी थांबलेले नायब तहसीलदार डॉ. रोहन काळे यांनी तपासणी केली असता टेम्पोत जवळपास चाळीस ते पन्नास व्यक्ती असल्याचे दिसून आले, त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांना होम क्वाईटरमध्ये रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या. या व्यक्ती बेडगा (ता. उमरगा) गावाचे रहिवाशी असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी टेम्पो ठाण्यात जमा करण्यात आला असून टेम्पोचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
खाजगी रुग्णालय झाले सुरू
कोरोना बाबत नागरीकांमध्ये भिती आहे. सर्दी, खोकला व ताप आजाराची जाणीव होताच व्यक्ती रुग्णालयात जाताहेत. उपजिल्हा रुग्णालयातील तोबा गर्दी पाहून शहरासह ग्रामीण भागातील बरेच नागरिक परत जाताहेत. शहरात खाजगी रुग्णालयाची संख्या पन्नासहुन अधिक आहे मात्र गेल्या चार -पाच दिवसापासून तेथील बाह्यरुग्ण कक्ष बंद होते, कांही रुग्णालयाची सेवा मर्यादित वेळेपूरती सुरू होती. त्यामुळे अनेकांची अडचण झाली. प्रशासनाने खाजगी रुग्णसेवा सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्याने आयएमएने निर्णय घेऊन गुरूवारी (ता. २६) कांही रुग्णालय सुरू केली. शुक्रवारी बरेच रुग्णालय वैद्यकिय सेवेसाठी सुरू करण्यात आली. खाजगी रुग्णालयाची अत्यावश्यक सेवा सुरू आहे. तपासणीसाठी आलेल्या व्यक्तींनी गुप्त माहिती न दडवता वस्तुस्थिती सांगावी जेणेकरुन डॉक्टर्स व अन्य रुग्णांची सूरक्षितता ठेवता येते असे आवाहन आयएमएच्या अध्यक्षा डॉ. दिपा मोरे यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.