Osamanabad DPDC meeting  News
Osamanabad DPDC meeting News  
मराठवाडा

साडेनऊ कोटींच्या घोटाळ्याला उस्मानाबादचे पालकमंत्री का देताहेत बगल?

सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्हाधिकारी स्तरावर झालेल्या साडेनऊ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात गुळगुळीत उत्तर देऊन प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांकडून केला जात असल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर होत आहे. नियोजन समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली मात्र त्याचा तपशील देण्याचे टाळत पालकमंत्री सावरासावर करण्याचा प्रयत्न करीत आहेत का? असा प्रश्‍न सामान्य नागरिकातून विचारला जात आहे. दरम्यान भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी या प्रकरणाची विभागीय स्तरावर चौकशी करण्याची मागणी बैठकीत उचलून धरली. 

शासनाकडून आलेला सुमारे नऊ कोटी 35 लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी स्तरावर एका स्वतंत्र खात्यावर ठेवण्यात आला होता. जिल्ह्यातील नगरपालिकांकडून प्रस्ताव मागवून त्यांना हा निधी वर्ग करणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात हा निधी कुठे खर्च झाला. कोणती कामे झाली. याचा काहीच थांगपत्ता लागत नाही. जिल्हाधिकारी हे प्रशासन अधिकाऱ्याकडे बोट दाखवित आहेत. तर प्रशासन अधिकारी मला माहिती नाही, असे म्हणत माहिती लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आधिकारात नसताना निधीची विल्हेवाट लावली आहे. कामे झालेली नसताना ठेकेदाराच्या खात्यावर पैसे वर्ग झाले असल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबत ‘सकाळ‘ने वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यानंतर रविवारी (ता.19) झालेल्या बैठकीतही आमदार सुजितसींह ठाकूर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. 

गौडबंगाल काय? 
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचे पालकमंत्री गडाख यांनी सांगितले. मात्र नेमकी काय चर्चा झाली. याची चौकशी कोणाकडून होणार? जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर जर याची चौकशी झाली तर ज्यांनी हा घोटाळा केला आहे. त्यांनाच चौकशी करण्यास सांगणार का? शिवाय चौकशी किती दिवसात पूर्ण होईल. या प्रश्‍नाची उत्तरे देण्यास पालकमंत्री गडाख यांनी टाळले. केवळ चर्चा झाली असे सांगत काय चर्चा झाली, याचा तपशील देणे टाळले आहे. एक बडा नेता या प्रकरणात मुंबईत जावून मंत्र्यांमार्फत दबाव वाढवत असल्याची चर्चा आहे. तो नेता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही बोलले जात आहे. पालकमंत्र्यांच्या या पवित्र्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रकाराला दुजोरा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गौडबंगाल अधिकच वाढले आहे.


अधिकार नसताना निधी खर्च केला आहे. ज्यांनी या कामाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यांनाच याची चौकशी करण्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात कामे झालेली नसताना ठेकेदाराला पैसे देण्यात आले आहेत. त्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. विभागीय स्तरावर चौकशी करावी. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत आहे. 
- सुजितसिंह ठाकूर, आमदार. 

या विषयावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे. निर्णय झाला आहे. तुम्हाला याचा निर्णय कळवू. या प्रकरणाची फाईल पाहिजे असेल तर लेखी अर्ज देऊन पाहू शकता. 
- शंकरराव गडाख, पालकमंत्री, उस्मानाबाद. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT