हिंगोली : निवडणूक विभागाने ज्या मतदारांची मतदार यादीत (Voter List) छायाचित्र नाहीत, अशांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार असल्याचे सांगितल्यानंतरही अद्यापही १२ हजार ३५८ मतदारांची छायाचित्रच मतदार यादीत नाही. याबाबत निवडणूक विभागाने (Election Department) माहिती दिली आहे. दरम्यान, निवडणूक विभागाने जानेवारी २०२१ पासून जिल्ह्यात मतदार यादी शुद्धीकरण मोहीम (Hingoli) राबविण्यात आली होती. यामध्ये ज्या मतदारांचे मतदार यादीत फोटो नाहीत अशांनी फोटो आणून देण्याचे काळविले होते. मात्र अद्यापपर्यन्त १२ हजार ३५८ मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात नऊ लाख २१ हजार १२१ मतदार असून यात वसमत (Vasmat) विधानसभा मतदारसंघात दोन लाख ९७ हजार ८३८ मतदार आहेत. यामध्ये ४०७ मतदारांची छायाचित्र मतदार यादीत नाहीत तर १२१ मतदारांची छायाचित्र संकलित करून अपलोड करण्यात आली आहेत.(above 12 thousand voter photos not on voter list in hingoli district glp88)
२८६ मतदारांनी फोटो न आणून दिल्यामुळे त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. तसेच कळमनुरी मतदारसंघात (Kalamnuri) तीन लाख दहा हजार ५६७ मतदार असून यापैकी ३९३६ मतदारांची छायाचित्र यादीत नाहीत तर ३८० मतदारांचे फोटो सुधारित यादीत अद्यावत करण्यात आले आहेत. ३ हजार ४१३ मतदारांनी फोटो आणून न दिल्याने नावे वगळण्यात आली आहेत. हिंगोली विधानसभा मतदारसंघात तीन लाख १२ हजार ७१६ मतदार आहेत. त्यापैकी आठ हजार १५ मतदारांचे फोटो मतदार यादीत अद्यावत नाहीत.५८९ मतदारांचे छायाचित्र संग्रहित झाले असून त्यांचे फोटो मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. सात हजार २४४ मतदारांनी अद्याप फोटो निवडणूक विभागाकडे जमा न केल्याने त्यांची नावे वगळली आहेत.
फोटो जमा केली नाही
आता जिल्ह्यात एकूण नऊ लाख २१ हजार १२१ मतदारांपैकी बारा हजार ३५८ मतदारांचे फोटो मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले नाहीत.आतापर्यन्त एक हजार ९० मतदारांनी फोटो आणून दिल्याने त्यांचे फोटो अपलोड करण्यात आले आहेत. दहा हजार ,९४३ मतदारांनी छायाचित्र निवडणूक विभागाकडे किंवा संबंधित मतदान केंद्र अधिकारी यांच्याकडे अनेक वेळा सांगून देखील फोटो न जमा केल्याने मतदार यादीतून नावे वगळली असल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.