Osmanabad News 
मराठवाडा

माझ्या बापाने नाही केला पेरा, तर तुम्ही काय खासाल का धतुरा? 

उत्कर्षा पाटील

संत गोरोबा काका साहित्यनगरी, उस्मानाबाद : "धर्म हा समानतेच्या पाठीवरचा आसूड', "मेलं नाही अजून आभाळ, बापा आताच आशा सोडू नको', "सांगा माझ्या बापाने नाही केला पेरा, तर तुम्ही काय खासाल का धतुरा', "हुकूमशाला सलाम' असा वास्तववादी हुंकार 93 व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या निमंत्रितांच्या कविसंमेलनात कवितेतून पाहायला मिळाला. 

लेखकांवर आलेली बंधने, झुंडशाही, पर्यावरणाचा ऱ्हास, शहरीकरण, स्त्री जाणीव, स्त्री भ्रूणहत्या, स्त्रियांची असुरक्षितता, शेतकऱ्याच्या आत्महत्या, शेतकऱ्याचे मनोबल वाढवणारे असे विषय कवितांतून मांडण्यात आले. या कवी संमेलनाचे अध्यक्षपद कवयित्री नीरजा यांनी भूषवले. 

आज आपल्या आजूबाजूचे वातावरण बदलले आहे. जगण्याचे प्रश्न कठीण झाले आहेत. पण जगण्याचा प्रश्नांकडे न पाहता एका वेगळ्या उन्मादात जगायला लावणारा जमाव, झुंड आपल्याभोवती पाहायला मिळते आहे. या कठीण काळाला सर्जनशील लेखकाला सामोरे जावे लागते, असे नीरजा म्हणाल्या. 

ज्यावेळी सर्जनशील कवी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलतो, तेव्हा कवीचे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाने जपायला हवे. आज आपण काय करायचे, काय खायचे, कोणते कपडे घालायचे, काय लिहायचे, कोणत्या विचारधारेच्या बाजूने उभे राहायचे, हे सर्व अदृश्‍य शक्ती ठरवते आहे. तुम्ही काहीही बोलले तरी लोक तुमच्यावर झुंडीने चालून येतात, असे वास्तव त्यांनी परखडपणे मांडले. 

या कवी संमेलनात इंद्रजित भालेराव, मंगेश विश्वासराव, आनंद पेंढारकर, सायमन मार्टिन, संदीप जगदाळे, नेहा भंडारकर, संजय वरकड, उद्धव कानडे, अशोक बागवे, देविदास फुलारी, बालाजी इंगळे, प्रमोद माने, रवींद्र लाखे, सुरेश कुलकर्णी, प्रकाश खरात, संजय चौधरी, संजीवनी तडेगावकर, रमेश पवार, विलास हडवळे, मारुती कटकधोंड, राजकुमार धुरगुडे पाटील, विनय दांदळे, अनंत नांदूरकर, भूषण रामटेके, देवेंद्र, तातोडे, शोभा रोकडे, शकुंतला सोनार, सुधीर बापट, मेघराज मेश्राम, मुबारक शेख, सुरेश नाईक, सुरेश वर्धे, रसिका देशभुख आदी कवींचा समावेश होता. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. केशव खटिंग यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: पश्चिम घाटात यंदा पावसाचा विक्रम! पहिल्या आठ दिवसांत इतका पाऊस का झाला? हवामान तज्ज्ञांनी सांगितले मोठे कारण

महाराष्ट्रात UCC लागू करण्याची तयारी! महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय; ७ सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन

Mumbai Pune Railway : मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुसळधार पावसामुळे एक्स्प्रेस रद्द, कोणत्या आणि कधीपर्यंत?

Ulhasnagar: कर्तव्यावर असतानाच काळाचा घाला! वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; कुटुंबाला 50 लाखांच्या मदतीची मागणी

OMG : ४७ षटकार...! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये संघाने कुटल्या ४१७ धावा; ओपनरचे ५४ चेंडूंत द्विशतक, तर दोघांची शतकं... १८८ धावांनी मॅच जिंकली

SCROLL FOR NEXT